VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा…!

| Updated on: Oct 19, 2021 | 12:57 PM

पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरुयं. पण हे देखील नियतीला मान्य नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर नांदपूर येथील शेतकऱ्याने उघडपीच्या काळात सोयाबीनची काढणी-मळणी केली. आता केलेले सोयाबीन साठवणूकीसाठी घेऊन जात असतानाच धो-धो पावसाला सुरवात झाली.

VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा...!
पावसामुळे सोयाबीनची झालेली अवस्था, अकोला जिल्ह्यातील स्थिती
Follow us on

अकोला :  (The Reality of Agriculture) स्वप्नांचा चुराडा कसा होतो ? याचे वास्तव (Akola) अकोल्यात समोर आलं आहे.. अथकचे परीश्रम, निसर्गाशी दोन हात करुनही शेतकऱ्यांचे स्वप्न मातीमोल कसे होते याचा प्रत्यय सांगण्यासाठी हे बोलके चित्र पुरसे आहे. आगोदरच अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने खरीपातील पीके ही पाण्यात होती. (Rain damages soyabean) त्यामुळे उत्पादनात घट तर आहेच शिवाय वावरात असलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरुयं. पण हे देखील नियतीला मान्य नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर नांदपूर येथील शेतकऱ्याने उघडपीच्या काळात सोयाबीनची काढणी-मळणी केली. आता केलेले सोयाबीन साठवणूकीसाठी घेऊन जात असतानाच धो-धो पावसाला सुरवात झाली.

पावसाचे पाणी सोयाबीनमधून जिरपत होते आणि प्रकाश पुंडे यांचे स्वप्न त्या पाण्यातच वाहून जात होते. नियतीने एवढीपण चेष्टा करु नये. हजारो रुपयांचा खर्च आणि गुडघ्याभर चिखलात शिरुन काढलेले सोयाबीन अक्षरश: डोळ्यादेखत वाहून गेले आहे. त्याप्रसंगीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पण गेलेले सोयाबीन पुन्हा येणार नाही हे ही तेवढंच खरं आहे…

खरीपातून उत्पादन नाही, नुकसानच

राज्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत. यातच खरीपातून अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असते. शिवाय या हंगामातील सोयाबीन पीकाचा कालावधी हा कमी असून अधिकचे उत्पादन. यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे तर कापसाच्या क्षेत्रात घट. यंदाही राज्यात 52 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला होता. सर्वकाही सुरळीत होते. पण पावसाची अशी काय अवकृपा झाली की सोयाबीन हे पाण्यातच आहे. अतिवृष्टीतून जीवदान मिळालेले सोयाबीन अखेर परतीच्या पावसात मातीमोल झाले आहे. शिवाय दरही 5 हजाराच्या खाली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे.

शेतकरी पुंडेच्या बाबतीत नेमके काय झाले?

अकोला जिल्ह्यातील पातूर नांदपूरचे प्रकाश पुंडे हे शेतकरी. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे सोयाबानची काढणी-मळणी कामे रखडली होती. म्हणून पावसाने उघडीप देताच त्यांनी सोयाबीनची काढणी केली आणि सोयाबीन गोळा करुन एकत्र साठवले होते. शिवाय यंत्राच्या सहाय्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी त्याची मळणी केली. मळणीचे काम आटोपून ट्रक्टर निघूनही गेला. आता केलेल्या सोयाबीन निवाऱ्याला ठेवण्यासाठी प्रकाशराव यांच्यातह सर्व कुटुंबातील सदस्य हे प्रयत्न करीत होते. अचानक पावसाला सुरवात झाली आणि काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. सोयाबीनचा ढीग, पोत्यामध्ये साठवलेले सोयाबीन सर्वकाही पावसाने भिजलेले आहे. हताश झालेले प्रकाशराव मात्र, ओंजळीने सोयाबीन गोळा करीत व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Rain damages soyabean, distress of helpless farmer in Akola)

संबंधित बातम्या :

हमीभाव केंद्रकाडे कोण फिरकणार ? बाजारात ‘पांढऱ्या सोनाल्या’ला अधिकचा दर

शेतकऱ्यांचे तर्क-वितर्क ; मात्र, अद्यापही विमा नुकसान भरपाईचे घोडे अडलेलेच ; काय आहे वास्तव ?

Formula ! एकरी 16 क्विंटल हरभरा, नियोजन अन् योग्य पध्दतीने पेरणीने सहज शक्य