Hapus Mango : ‘शिवनेरी’ हापूसलाही भौगोलिक मानांकन..! जुन्नरच्या वैभवात पडणार भर

| Updated on: Apr 05, 2022 | 9:33 AM

यंदा आंबा उत्पादनात घट झाली असली फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा तोरा हा कायम आहे. मात्र, हापूस आंब्याच्या नावाखाली इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची विक्री केली जात आहे. विशेषत: मुंबई बाजारपेठेत असे प्रकार समोर आले आहेत. राज्यात बोगस हापूस आंब्याची चर्चा सुरु असतानाच आता शिवनेरी हापूसला भौगोलिक मानांकन देण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे शिवनेरी आंब्यालाही महत्व प्राप्त होणार असून जुन्नरच्या वैभवात भर पडणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारकडूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Hapus Mango : शिवनेरी हापूसलाही भौगोलिक मानांकन..! जुन्नरच्या वैभवात पडणार भर
जुन्नरच्या शिवनेरी हापूसलाही भौगोलिक मानांकन मिळवून देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : यंदा (Mango Production) आंबा उत्पादनात घट झाली असली फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा तोरा हा कायम आहे. मात्र, हापूस आंब्याच्या नावाखाली इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची विक्री केली जात आहे. विशेषत: मुंबई बाजारपेठेत असे प्रकार समोर आले आहेत. राज्यात बोगस हापूस आंब्याची चर्चा सुरु असतानाच आता (Shivneri Hapus) शिवनेरी हापूसला (Geographical Rating) भौगोलिक मानांकन देण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे शिवनेरी आंब्यालाही महत्व प्राप्त होणार असून जुन्नरच्या वैभवात भर पडणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारकडूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत. भौगोलिक मानांकन मिळाल्यास स्थानिक बाजारपेठेत आणि निर्यातीसाठी अधिकचा दर मिळणार आहे. पण यासाठी शिवनेरी हापूस हा सर्वगुण संपन्न असणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असून यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

जुन्नरच्या हापूसची चवच न्यारी…

भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी आंबा हा सर्वगुण संपन्न असायला हवा. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तताही या फळबागायतदार शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. जुन्नर भागातील हापूस आंबा चवीला गोड, रसाळ आणि रुचकर आहे. याचा वास, रंग या सर्वच बाबतीत तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आंब्याला ऐतिहासिक असे महत्वही आहे. पुराणकाळातील ग्रंथांपासून ते मध्ययुगीन आणि शिवकालीन ग्रंथांमधेही आंब्याचे उल्लेख आहेत. या सर्व बाबींमुळे शिवनेरीच्या आंब्याला भोगोलिक मानांकन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून आता याबाबतची प्रक्रिया ही सुरु झाली आहे.

भौगोलिक मानांकन प्रक्रियेची जबाबदारी विज्ञान केंद्रावर

भौगोलिक मानांकन हे उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता पाहून दिले जाते. यामुळे त्या भौगोलिक ठिकाणला वेगळे महत्व प्राप्त होते. भारत सरकारच्या माध्यमातून हे मानांकन दिले जाते. शिवनेरी हापूसची चव, दर्जा आणि सर्व बाबींचे परिक्षण करण्याची जबाबदारी ही नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मानांकनाच्या अनुशंगाने प्रक्रिया तर सुरु झाली आहे. शिवाय यासाठी 30 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. जुन्नर परिसरातील भौगोलिक स्थिती मूळचे उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा तपासणीची प्रक्रिया संपल्यानंतर मानांकनाबाबत ठरणार आहे.

काय होतो फायदा ?

भौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पादनांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे.हे मानांकन केंद्र सरकारच्या ‘औद्योगिक धोरण व प्रोत्साहन’ विभागातर्फे जारी करण्यात येते. हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते.याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते.

संबंधित बातम्या :

Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा

Cotton Rate : फेब्रुवारी वगळता कापूस तेजीतच, आता फरदड कापसाचाही तोरा कायम..!

Latur Market : सोयाबीनची विक्रमी आवक, 5 दिवसाच्या बंद नंतर काय आहे बाजारपेठेतले चित्र?

https://www.youtube.com/shorts/SFsY0HgjxE8