Solapur : कोर्टाने निकाल देऊनही रस्ता मिळत नाही, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान ; उपोषणाचा इशारा

ब्रम्हदेव ज्ञानदेव काळे या शेतकऱ्याला तहसिलदार, कोर्ट यांनी निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता खुला केला होता. परंतु त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याने तो रस्ता पुन्हा बंद केला.

Solapur : कोर्टाने निकाल देऊनही रस्ता मिळत नाही, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान ; उपोषणाचा इशारा
crop damaged
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 1:55 PM

सोलापूर : करमाळा (karmala) तालुक्यातील वडशिवणे येथील ब्रम्हदेव ज्ञानदेव काळे या शेतकऱ्याला (farmer) जमीन गट नंबर 67 मध्ये येण्या जाण्यासाठी तहसीलदार, कोर्ट यांचा निकाल असतानाही अडवण्यात आला आहे. रस्ता खुला नसल्याने द्राक्षे बाहेर काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. रस्ता न मिळाल्यास सर्व कुटूंबासहित उपोषण करणार असल्याचे शेतकरी दिलीप ब्रम्हदेव काळे यांनी सांगितले आहे. शेतीसाठी रस्ता नसल्याने पीकांचं नुकसान (crop damaged) झाल्याची अनेक प्रकरण आतापर्यंत आपण पाहिली आहेत.

ब्रम्हदेव ज्ञानदेव काळे या शेतकऱ्याला तहसिलदार, कोर्ट यांनी निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता खुला केला होता. परंतु त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याने तो रस्ता पुन्हा बंद केला. त्यानंतर पीडित शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतली पोलिसांनी ज्याने रस्ता अडविला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु पोलिसांच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही असे दिलीप काळे यांनी सांगितले आहे. रस्ता नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये, म्हणून जर रस्ता नाही मिळाला तर करमाळा तहसील कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबासहित उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी दिलीप ब्रम्हदेव काळे या शेतकऱ्याने दिला आहे.

शेती करीत असताना अपार कष्ट घ्यावे लागतात. इतके कष्ट घेतल्यानंतर सुध्दा निसर्गाने साथ दिली नाहीतर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. अवकाळी पावसाने सध्या अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठ नकसान झालं आहे. सरकार मदतीकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे.