उशीराची पेर नुकसानीची, ‘सोयाबीनवर यलो मोझॅक’,

| Updated on: Sep 20, 2021 | 1:14 PM

उशीराने पेरणी झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे तर पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन हे बाजारात. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम हा या सोयाबीनवर तर झालेलाच आहेच शिवाय आता 'यलो मोझॅक' (Yellow Mozak) चा प्रादुर्भाव यावर दिसून येत आहे.

उशीराची पेर नुकसानीची, सोयाबीनवर यलो मोझॅक,
किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनची अवस्था
Follow us on

लातुर : पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी ही सुरु आहे तर उशीराने पेरा झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे. खरीप घाईंन आणि रब्बीची पेर दमानं.. अस आजही ग्रामीण भागात म्हटलं जातं..हे कशामुळे ते उशीराने पेरणी करणाऱ्यां शेतकऱ्यांच्या (Farmer) लक्षात आले आहे. उशीराने पेरणी झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे तर पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन हे बाजारात. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम हा या सोयाबीनवर तर झालेलाच आहेच शिवाय आता ‘यलो मोझॅक’ (Yellow Mozak) चा प्रादुर्भाव यावर दिसून येत आहे.

हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने किडीचा प्रादुर्भाव आणि आता शेंग भरण्याच्या अवस्थेत असताना सोयाबीनची पाने ही पिवळी पडत आहेत. सोयाबीन पानाच्या शिरामध्ये विषाणूजन्य रोगाचा संचार झाल्याने पाने ही पिवळी पडत आहेत. पांढऱ्या आळीमुळे सोयाबीनची ही अवस्था झाल्याचे अंबाजोगाई कृषी महाविद्यालयातील डॅा. जायवार यांना सांगितले आहे. शिवाय ज्या सोयाबीनवर या कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे ते रोप शेतातून काढून टाकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अन्यथा इतर रोपालाही याची लागण होते व उत्पादनात घट होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पाने पिवळी पडतात का यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गेल्य़ा काही दिवसांपासून अंबाजोगाई, रेणापूर, औसा तालुक्यातील उजनी या परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. एकीकडे पावसामुळे खरीपातील उत्पादनात घट होण्याचा धोका आहे तर दुसरीकडे आता ‘यलो मोझॅक’ मुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यामुळे झाली होती सोयाबीनची उशीराने पेरणी

खरिप हंगामाच्या सुरवातीला सर्वत्र समान पाऊस हा झालेला नव्हता. अनियमित पावसामुळे चाढ्यावर मूठ धरावी का नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका होती. शिवाय एकाच पावसावर पेरणी करावी कशी या धास्तीने शेतकऱ्यांनी योग्य वेळेची वाट पाहणे पसंत केले मात्र, पुन्हा पावसाने उघडीपच दिली नाही परिणामी पेरणीला उशीर झाला आणि त्यामुळेच सध्याचे नुकसान हे होत आहे.

‘यलो मोझॅक’वर काय आहेत उपाय

सोयाबीनची पिवळी पाने ही पांढऱ्या आळीच्या प्रादुर्भावामुळे होतात. मात्र, एका रोपावर झालेला प्रादुर्भाव त्वरीत आटोक्यात आणला नाही तर रोपांनाही त्याची लागण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाढऱ्या आळीचा बंदोमस्त होईल अशा औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा पिवळी पडलेली झाडे ही शेतातून बाहेर फेकूण देणे हाच यावरील पर्याय असल्याचे कृषी अभ्यासक यांनी डॅा. जायवार यांनी सांगितले आहे.

धोका कमी असला काळजी ही गरजेची

सद्यस्थितीला सर्वत्रच खरीपातील पिकांच्या काढणीचा लगबग ही सुरु आहे. असे असले तरी उशीराने पेरणी झालेल्या सोयाबीनवर यलो मोझॅक चा प्रादुर्भाव हा पाहवयास मिळत आहे. विशेष:ज्या क्षेत्रात अधिकचा पाऊस झाला त्या ठिकाणी सोयाबीनची पाने ही पिवळी पडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिवळे पडलेले सोयाबीन शेतातून बाहेर काढावे अन्यथा एका झाडामुळे इतर 100 झाडे बाधित होण्याचा धोका असल्याचे डॅा. जायवार यांनी सांगितले आहे. (Soyabean leaves yellow, late sowing effect in Marathwada)

संबंधित बातम्या :

खरीपानंतर आता कांदाही धोक्यात, पावसानंतर वाढली आर्द्रता

वावरात आलेलं पीक आता पदरात पाडून घेण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता, शेतकऱ्यांसाठी मुहत्वपूर्ण सल्ला

ई-पीक पाहणी : मोबाईलवर केलेली नोंद सातबाऱ्यावरही येणार, 30 सप्टेंबरपर्यंतच मुदत