खरीपानंतर आता कांदाही धोक्यात, पावसानंतर वाढली आर्द्रता

पावसानंतर आर्द्रता वाढल्याने कांद्याची वाढ तर खुंटलेलीच आहे शिवाय कांद्याच्या मुळावर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना नेमके उत्पादन कशातून मिळणार हा मोठा प्रश्न आहे. खरिप पिकांचे पावसामुळे नुकसान तर झालेले आहेच शिवाय चांगला दर मिळाला तर रात्रीतून लखपती करणाऱ्या कांद्याचे पिक धोक्यास असल्याने शेतकरी अडचणीत आहे.

खरीपानंतर आता कांदाही धोक्यात, पावसानंतर वाढली आर्द्रता
अवकाळी पावसामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 11:54 AM

लातुर : मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम आता कांद्यावरही (Onion) पाहवयास मिळत आहे. (Rain) पावसानंतर आर्द्रता वाढल्याने कांद्याची वाढ तर खुंटलेलीच आहे शिवाय कांद्याच्या मुळावर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना नेमके उत्पादन कशातून मिळणार हा मोठा प्रश्न आहे. खरिप पिकांचे पावसामुळे नुकसान तर झालेले आहेच शिवाय चांगला दर मिळाला तर रात्रीतून लखपती करणाऱ्या कांद्याचे पिक धोक्यास असल्याने शेतकरी अडचणीत आहे.

पावसानंतर आता शेतात भरपूर आर्द्रता निर्माण झाली आहे जे कांदा पिकासाठी धोकादायक आहे. कांद्याचे मुळ सडने, मुळाला पांढऱ्या आळीचा घेराव आणि वाढती आर्द्रता यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा चिंतेत आहे. या तीन रोगांचा प्रादुर्भाव सर्रास कांद्यावर पाहवयास मिळत आहे. या किडीचा कांद्यावर प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

अशा पध्दतीने करा किडीचे नियोजन

किडीपासून कांदा पिकाचा बचाव करण्यासाठी कार्बेंडाझीम 75% डब्ल्यूपी + मंकोझेब 63% डब्ल्यूपी 2 ग्रॅम औषधे प्रति एक लिटर पाण्यात मिसळून फवारणे गरजेचे आहे. तर कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% डब्ल्यूपी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. किडीचा प्रादुर्भाव नसला तरी कांदा वाढीसाठीही शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करणे गरजेचे आहे.

असे करा कांदा आणि रोपाचे व्यवस्थापन

वातावरणातील बदल आणि मध्यंतरीच्या पावसामुळे कांद्यावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्यामध्ये 65 टक्के सल्फर आणि 10 टक्के केनिकॅानॅझोन हे एकत्र असलेले औषध बाजारपेठेत उपनब्ध आहे. ते एकरी 30 ग्रॅम फवाराचे आहे. त्याच्या सोबत झिप्रोनील 30 मिली, लॅबडासायरोथ्रीन हे 8 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून शेतकऱ्यांना फवाराणी तात्का करावी लागणार आहे. यामुळे कांदा आणि कांद्याचे रोपही जोमात येणार आहे. दिवसागणिक वातावरणात बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी करणे गरजचे झाले आहे.

हलक्या प्रतिच्या जमिनीवर होतेय कांद्याची लागवड

रोप अवस्थेत दीड महिना आणि लागवडीनंतर चार महिने असे साडेपाच महिन्याचे कांदा पिक आहे. हलक्या प्रतिच्या जमिनीवर कांद्याची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे खरिपात तीन महिन्याचे पिक असलेल्या उडीदाचे क्षेत्र हे कांद्यासाठी राखून ठेवले जात आहे. आता उडीदाची काढणी झाली असून कांद्याची लागवड ही सुरु झाली आहे.

मजुराअभावी यांत्रीकरणाचा होतोय वापर

शेती कामासाठी मजूरांची टंचाई भासत आहे. शिवाय प्रत्येकाच्या शेतामध्ये खरीप काढणीची कामे सुरु असल्याने मजुर मिळत नाहीत. त्यामुळे कांदा लागवडीसाठी देखील आता यंत्राचा वापर वाढलेला आहे. यामुळे उत्पादनावर थोडा परिणाम होत असला तरी औषध फवारणीमधून त्याची सर भरुन काढण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. सध्या शेतशिवारात कांदा लागवडीची लगबग ही सुरु आहे. मात्र, लागवडीपूर्वीच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता बाजारपेठेत काय भाव खातयं हे पहावे लागणार आहे.

पांढऱ्या आळीचा बंदोमस्त करण्यासाठी क्लोरोपायरिफॉस 50% ईसी + सायपरमेथ्रिन 5% ईसी 500 ग्रॅम प्रति एक्कर ते पावडर मध्ये मिसळून फवारल्यात किडीचा प्रादुर्भाव टळला जातो तर कांद्याची वाढ होते. (Onion also gets pest outbreak due to rain, farmers in trouble)

इतर बातम्या :

‘मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर’, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकात पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, आता फडणवीसांचा पलटवार

Weather Forecast: राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार, IMD कडून अंदाज जारी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.