Weather Forecast: राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार, IMD कडून अंदाज जारी

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. आजपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Weather Forecast: राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार, IMD कडून अंदाज जारी
प्रातिनिधिक फोटो


मुंबई: राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. आजपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या सिस्टिम मुळे व त्याच्या संभवित पुढच्या 2,3 दिवसात आतल्या दिशेने सरकण्याच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

राज्यात कुठं पाऊस होणार? 

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)

20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती, डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

इतर बातम्या:

Defamation Case | अटकेची टांगती तलवार, न्यायाधीशांचा अल्टीमेटम, आता तरी कंगना रनौत सुनावणीला हजर होणार का?

पुण्यात 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, लहान मुलासह आलेल्या दोन महिलांकडून चोरी

…आणि मुलं इंग्रजी बोलू लागली! नाशिकच्या दुगलगावाचं रुपं शिक्षक आणि गावकऱ्यांनी पालटलं, माय इंग्लिश विलेज संकल्पना नेमकी काय?

IMD issue rain heavy rain fall alert in Maharashtra during next two and three days

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI