Defamation Case | अटकेची टांगती तलवार, न्यायाधीशांचा अल्टीमेटम, आता तरी कंगना रनौत सुनावणीला हजर होणार का?

गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबंधित प्रकरणात आज (20 सप्टेंबर) अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हजर राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Defamation Case | अटकेची टांगती तलवार, न्यायाधीशांचा अल्टीमेटम, आता तरी कंगना रनौत सुनावणीला हजर होणार का?
कंगना रनौतने शिवसेनेवर साधला निशाणा, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 11:35 AM

मुंबई : गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबंधित प्रकरणात आज (20 सप्टेंबर) अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हजर राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मागील सुनावणीत अंधेरी न्यायालयाने  कंगनाला इशारा दिला आहे की, या सुनावणीला जर ती उपस्थित राहिली नाही, तर तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला जाणार आहे.

मागील सुनावणीत कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते की, कंगनाची तब्येत ठीक नाही, तिला कोरोनाची लक्षणे असल्याने तिला टेस्ट देखील करून घ्यायची होती. मात्र, आज कंगनाला कोर्टात हजर रहावेच लागणार आहे.

अटकेची टांगती तलवार

लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता, ज्यावर 14 सप्टेंबर अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते. पण, कंगना रनौत कोर्टात पोहोचली नाही. कंगनाच्या वकिलाचे म्हणणे होते की, अभिनेत्रीची तब्येत खराब आहे, म्हणूनच ती न्यायालयात हजर राहू शकली नाही. आता या प्रकरणी सुनावणी आज होणार आहे. पण, न्यायाधीशांनी म्हटले आहे की, जर कंगना या सुनावणीत न्यायालयात हजर झाली नाही, तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल.

न्यायालयात काय घडले?

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात सांगितले की, कंगना आजारी आहे. त्यामुळे ती न्यायालयात येऊ शकत नाही. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, म्हणून त्यांना आजच्या सुनावणीपासून सूट दिली पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, कंगनाला कोरोना चाचणी करावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अनेक लोकांना भेटली आहे. कंगनाच्या वकिलाने कोर्टात वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले आहे आणि एक आठवड्याचा वेळही मागितला आहे.

काय म्हणाले जावेद यांचे वकील?

जावेद अख्तरचे वकील म्हणतात की, अनेक नोटिसा देऊनही कंगना कोर्टात येत नाही. त्याचबरोबर तक्रारदार जावेद अख्तर सतत न्यायालयात येत आहेत. तसेच न्यायव्यवस्थेचा सन्मान केला जात नाही. या प्रकरणाला जाणीवपूर्वक विलंब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे, ते म्हणाले.

न्यायाधीशांनी ही सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यावेळी जर कंगना आली नाही, तर तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले जाईल. आता कंगनाला पुढील सुनावणीला हजर राहावे लागेल आणि जर ती कोर्टात आली नाही, तर तिच्या अडचणी वाढू शकतात.

गुन्हा का नोंदवला गेला?

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने काही मुलाखतींमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात अनेक वक्तव्ये केली. तेव्हा जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात हा खटला दाखल केला होता. यानंतर जावेद यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यांनी अभिनेत्रीवर आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमधील हे प्रकरण चालू आहे.

हेही वाचा :

Sonu Sood | कोट्यवधींच्या अफरातफरीचा आरोप, आता सोनू सूद म्हणतोय ‘कर भला, तो भला, अंत भले का भला’!

Happy Birthday Mahesh Bhatt | परवीन बाबीसोबत अफेअर ते कंगनासोबत गैरवर्तन, अनेक वादांचा भाग बनलेयत महेश भट्ट

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.