Latur Market: शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, सोयाबीन दर स्थिरावले, आता घ्या निर्णय..!

| Updated on: Feb 15, 2022 | 1:42 PM

हंगाम सुरु झाल्यापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा कायम राहिलेला आहे. असे असले तरी दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 वर होते ते आता 6 हजार 500 आले आहेत. वाढीव दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. तो उद्देश आता साध्य झाला असल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात घट होण्यास सुरवात झाली होती.

Latur Market: शेतकऱ्यांनो हीच ती योग्य वेळ, सोयाबीन दर स्थिरावले, आता घ्या निर्णय..!
सोयाबीन संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : हंगाम सुरु झाल्यापासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा कायम राहिलेला आहे. असे असले तरी दिवाळीपूर्वी (Soybean Rate) सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 वर होते ते आता 6 हजार 500 आले आहेत. वाढीव दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. तो उद्देश आता साध्य झाला असल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात घट होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी उजाडताच दर हे वाढलेले आहेत. सध्या (Kharif Season) हंगामातील सर्वाधिक दर सोयाबीनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या (Soybean Stock)  सोयाबीनची विक्री करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर हे 10 हजारापर्यंत जावेत अशी अपेक्षा आहे. मात्र, यंदा काही गतवर्षीप्रमाणे स्थिती नाही. सोयाबीन हे पावसामुळे डागाळलेले आहे शिवाय त्या तुलनेत मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच उत्पन्नात वाढ होणार आहे.

6 हजार 500 स्थिरावले सोयाबीन, आवकही सरासरी

गेल्या सहा दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. अखेर 6 हजारावरील सोयाबीन हे 6 हजार 500 वर येऊन स्थिरावले आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे. त्यामुळे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विक्रीची हीच योग्य वेळ समजून साठवणूकीतले सोयाबीन बाजारात आणणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 500 चा दर मिळत आहे. तर 17 ते 20 हजार पोत्यांपर्यंतची आवक सुरु आहे. गतवर्षी मे महिन्यामध्ये सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळाला होता. पण यंदा तशी स्थिती नसल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

उन्हाळी सोयाबीनही जोमात

आतापर्यंत केवळ खरीप हंगामात बियाणे उपलब्ध व्हावे या अनुशंगाने उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा केला जात होता. पण यंदा पीक पध्दतीमध्ये मोठा बदल झाला असून उन्हाळी हंगामात उत्पादनाच्या दृष्टीकोनातून शेतकरी प्रयत्न करीत आहेत. शिवाय उन्हाळी सोयाबीन हे जोमात आहे. उद्या या सोयाबीनची आवक सुरु झाली तर आहे त्या दरात घसरण होईल. शिवाय पुन्हा सर्वकाही मागणीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी सोयाबीनची विक्री करणे महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : कडधान्य उत्पादन वाढीसाठी ‘त्रिसुत्री’ कार्यक्रम, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा काय सल्ला?

रेशीम शेती एक उत्तम पर्याय, क्षेत्रही वाढले अन् आता उद्योगांची संख्याही, जाणून घ्या सर्वकाही

Rabi Season : पीक पध्दतीमध्ये बदल, ज्वारीचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी कोणते पीक निवडले..!