Rabi Season : कडधान्य उत्पादन वाढीसाठी ‘त्रिसुत्री’ कार्यक्रम, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा काय सल्ला?

यंदा प्रथमच रब्बी हंगामातही कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. रब्बी हंगामातील पिकांपेक्षा कडधान्यांचे दर अधिकचे असल्याने शेतकऱ्यांनी या नगदी पिकावर भर दिला आहे. सर्वकाही पोषक असले तरी लागवडीपासून काढणी पर्यंत योग्य व्यवस्थापन झाले तर उत्पादनात वाढ होणार आहे.

Rabi Season : कडधान्य उत्पादन वाढीसाठी 'त्रिसुत्री' कार्यक्रम, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा काय सल्ला?
पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पीक हे जोमात आहे.
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 1:09 PM

परभणी : यंदा प्रथमच (Rabi Season) रब्बी हंगामातही कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. रब्बी हंगामातील पिकांपेक्षा (Prices of pulses) कडधान्यांचे दर अधिकचे असल्याने शेतकऱ्यांनी या नगदी पिकावर भर दिला आहे. सर्वकाही पोषक असले तरी लागवडीपासून काढणी पर्यंत योग्य (Crop Management) व्यवस्थापन झाले तर उत्पादनात वाढ होणार आहे. त्याच अनुशंगाने शेतकऱ्यांनी केलेला बदल यशस्वी होण्यासाठी आता कृषी विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेतला आहे. उत्पादनात वाढ व्हावी याअनुशंगाने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना कडधान्याचे सुधारित वाण, खतांचे योग्य नियोजन आणि रोग व्यवस्थापन या त्रिसुत्रांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जात आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केले तर उत्पादनात वाढ होणार आहे.

हरभरा पिकाचे व्यवस्थापन

यंदा हरभरा क्षेत्रात लक्षणिय वाढ झाली आहे. शिवाय पहिल्या पेऱ्यातील हरभरा काढणीच्या अवस्थेत आहे तर दुसरीकडे पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थापन करताना हरभरा पिकाला साधारणपणे 25 सेमी पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. मध्यम जमिनीमध्ये सुमारे 25 ते 30 दिवसांनी द्यावे. 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे लागते. पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तण विरहीत ठेवावे. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी लागते. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीनंतर एक खुरपणी केल्यास पीक बहरणार असल्याचे परभणी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रशांत भोसले यांनी केले.

कीड व रोग व्यवस्थापन

हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे अधिकतर नुकसान होते. पीक 3 आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. अशावेळी लिंबोळीच्या 5 टक्के द्रावणाची एक फवारणी करावी लागणार आहे. यानंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. पक्षांना बसायला जागोजागी T आकाराचे सापळे उभे करावे लागणार आहे. जेणेकरुन त्यावर चिमण्या, सांळुक्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात. अशाप्रकारे हेक्टरी 5 फेरोमेनचे सापळे लावावेत.

काढणी दरम्यान घ्यावयाची काळजी

हरभरा हे पीक पेरणीनंतर साडेतीन ते चार महिन्यांमध्ये काढणीला येते. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभ-याची काढणी करुन मळणी करावी. यानंतर धान्यास 5-6 दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवल्यानंतर त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा त्यामुळे साठवणीत कीड लागणार नसल्याचे डॉ. प्रा. प्रशांत भोसले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

रेशीम शेती एक उत्तम पर्याय, क्षेत्रही वाढले अन् आता उद्योगांची संख्याही, जाणून घ्या सर्वकाही

Rabi Season : पीक पध्दतीमध्ये बदल, ज्वारीचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी कोणते पीक निवडले..!

व्हॅलेंटाईनला गुलाबासोबत चालून आली ‘लक्ष्मी’, पुण्यातल्या मावळ प्रांतात शेतकऱ्यांना गणित परफेक्ट जमलं!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.