AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशीम शेती एक उत्तम पर्याय, क्षेत्रही वाढले अन् आता उद्योगांची संख्याही, जाणून घ्या सर्वकाही

'विकेल तेच शेतामध्ये पिकलं' तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, हा बदल घडून येण्यासाठी योग्य वेळ आणि चांगल्या पर्यायाची आवश्यकता असते. रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर चांगला पर्याय तर उभा राहत आहे. शिवाय रेशीमच्या दरात कायम वाढ होत असल्याने ती योग्य वेळही आली आहे.

रेशीम शेती एक उत्तम पर्याय, क्षेत्रही वाढले अन् आता उद्योगांची संख्याही, जाणून घ्या सर्वकाही
जालना येथील खरेदी केंद्रावरच आता रेशीम कोषची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 15, 2022 | 12:22 PM
Share

नागपूर : ‘विकेल तेच शेतामध्ये पिकलं’ तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, हा बदल घडून येण्यासाठी योग्य वेळ आणि चांगल्या पर्यायाची आवश्यकता असते. (Silk Farming) रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर चांगला पर्याय तर उभा राहत आहे. शिवाय रेशीमच्या दरात कायम वाढ होत असल्याने ती योग्य वेळही आली आहे. एवढेच नाही तर आता (Silk Thread) रेशीम धागा तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये 2 ची भर पडणार आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रामुळे उत्पादन वाढले तरी बाजारपेठ उपलब्ध राहणार आहे. गेल्या वर्षभरापासून  (Directorate General of Silk) रेशीम महासंचालनालयाचे प्रयत्न आणि शेतकऱ्यांना या पीक पध्दतीमधील बदलाचे महत्व कळाल्याने राज्यात यंदा 19 हजार हेक्टरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर भर पडणार आहे आणि शिवाय एक चांगला पर्यायही उभा राहणार आहे.

रेशीम कोशाला विक्रमी दर, असा घ्या अनुदानाचा लाभ

तुती लागवड क्षेत्र वाढले असतानाही गत आठवड्यात रेशीम कोशाला 1 हजार 42 रुपये किलो असा दर मिळाला होता. म्हणजेच 1 लाख रुपये क्विंटल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन लागवड करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत 1 एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण 2 लाख 176 रुपये इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात 92 हजार 289 रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

धागा तयार करणाऱ्या उद्योगाची काय आहे स्थिती?

राज्यात कोशापासून धागा तयार करणारे उद्योग हे तीन आहेत. यामध्ये अणखीन 2 उद्योगांची भर पडणार असल्याचे रेशीम महासंचालनालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात यंदा तुती लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढणार हे निश्चित असून शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुशंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दोन उद्योग उभारणीला मंजूरी मिळाली असून लवकरच याचे काम सुरु होणार असल्याचे रेशीम महासंचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी सांगितले आहे.

19 हजार हेक्टरावर तुतीची लागवड

गेल्या वर्षभरापासून तुती लागवडीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले जात आहे. रेशीम महासंचालनालयाच्यावतीने जनजागृतीसाठी महारथ रॅलीही काढण्यात आली होती. त्याचा फायदा झाला असून यंदा 19 हजार हेक्टरावर तुतीची लागवड झाली आहे. यामधून 2 हजार 205 टन कोश उत्पादन मिळेल असा दावा आहे. वाढत्या उत्पादनाबरोबर उद्योगही वाढणे गरजेचे आहे. यामुळे दोन उद्योग उभारणीला परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season : पीक पध्दतीमध्ये बदल, ज्वारीचे क्षेत्र घटले, शेतकऱ्यांनी कोणते पीक निवडले..!

व्हॅलेंटाईनला गुलाबासोबत चालून आली ‘लक्ष्मी’, पुण्यातल्या मावळ प्रांतात शेतकऱ्यांना गणित परफेक्ट जमलं!

जालन्याच्या मोसंबीला किसान रेल्वेचे ‘इंजिन’, क्षेत्रही वाढले अन् शेतकऱ्यांचे उत्पन्नही

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?