सोयाबीनचे दर विक्रमी पातळीवर, आवक कमी असताना मागणी वाढल्यानं किंमती वाढल्या

परदेशी बाजारात मंदी असूनही, देशातील येत्या काळातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणीतील वाढ कायम असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमती स्थानिक तेल-तेलबिया बाजारात बुधवारी विक्रमी पातळीवर पोहोचल्या.

सोयाबीनचे दर विक्रमी पातळीवर, आवक कमी असताना मागणी वाढल्यानं किंमती वाढल्या
सोयाबीन

नवी दिल्ली: परदेशी बाजारात मंदी असूनही, देशातील येत्या काळातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणीतील वाढ कायम असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किंमती स्थानिक तेल-तेलबिया बाजारात बुधवारी विक्रमी पातळीवर पोहोचल्या. मंडईंमध्ये कमी आवक व स्थानिक मागणी लक्षात घेता, मोहरी तेल तेलबिया, सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमतींमध्येही सुधारणा झाली आहे, तर अन्य तेला-तेलबियांच्या किंमती सामान्य व्यापाराच्या दरम्यान मागील स्तरावर बंद झाल्या आहेत.

शिकागो एक्सचेंज एक टक्क्याने खाली असताना मलेशिया एक्सचेंज अस्थिरतेशिवाय बंद असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागणी वाढत असताना मंडईमध्ये मोहरी आणि सोयाबीन तेलबियांची आवक फारच कमी आहे, त्यामुळे सोयाबीनची किंमत विक्रमी पातळीवर गेली आहे, असं व्यापारी म्हणाले.

सोयाबीनची किंमत 8700 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली

महाराष्ट्रातील लातूर कीर्तीमध्ये सोयाबीन बियाण्याचा ‘प्लांट डिलिव्हरी’ भाव 8450 रुपये क्विंटलवरून 8650 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. यामध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) स्वतंत्रपणे आकारला जाणार आहे. महाराष्ट्रातील नांदेडमधील लागवड करणार्‍यांनी प्रति क्विंटल 8700 रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली आहे. खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी करण्याऐवजी तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्या आयातीसाठी परदेशी बाजारावरील अवलंबन कमी होऊ शकेल. व्यापाऱ्यंनी पामोलिनच्या आयातीस आळा घालणे आवश्यक आहे, अन्यथा घरगुती तेल शुद्धीकरण कंपन्या चालवणे कठीण होईल, असं म्हटलं आहे.

मोहरीची आवक कमी होण्याचा कल

हाफेड या सहकारी संस्थेने अद्याप बाजारभावाने मोहरी खरेदी करून त्याचा साठा करावा जेणेकरून मोहरीच्या पुढील पिकासाठी बियाण्याची कमतरता भासू नये, असं सूत्रांनी सांगितले. जर बियाण्यांसाठी योग्य व्यवस्था केली गेली तर मोहरीचे उत्पादन दुप्पट होऊ शकते. देशभरातील बाजारसमितीत मोहरीची आवक दोन लाख पिशव्यांवरून 1.40 लाखांवर आली आहे. मोहरीच्या कमतरतेमुळे 30-40 टक्के गळीत गिरण्या बंद झाल्या आहेत.

इतर बातम्या:

कोरोना काळात नोकरीची अनिश्चितता, इंजिनिअर, एमबीए तरुणांनी कुक्कुटपालनाची धरली वाट

Monsoon Alert : राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून रेड, ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी

Soybean seeds prices on record level after demand of soybean and edible oil increased in the domestic market

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI