Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!

| Updated on: Jan 18, 2022 | 4:10 PM

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही गाळपाचा कालावधी ओलांडला तरी ऊस हा फडातच आहे. त्यामुळे ऊसाला तुरे तर लागलेच आहेत पण आता उताऱ्यातही घट होईल याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. लागवडीपासून 11 ते 12 महिन्यामध्ये (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे.

Sugarcane Sludge : क्षेत्र वाढले, गाळप रखडले आता अवघे दोन महिने उरले..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : ऊस लागवडीपासून ते गाळपापर्यंत योग्य नियोजन झाले तरच ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, या दरम्यान जर नियोजन हुकले तर त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थार्जनावर होणार आहे. काळाच्या ओघात उत्पादन अधिक त्याच पिकावर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. लातूर जिल्ह्यात (Sugarcane Area) ऊसाचे सरासरी क्षेत्र हे 20 हजार हेक्टर असताना सध्या 40 हजार हेक्टरहून अधिकची लागवड झाली आहे. सध्या ऊसाचा हंगाम मध्यावर आलेला आहे. असे असताना (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही गाळपाचा कालावधी ओलांडला तरी ऊस हा फडातच आहे. त्यामुळे ऊसाला तुरे तर लागलेच आहेत पण आता उताऱ्यातही घट होईल याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. लागवडीपासून 11 ते 12 महिन्यामध्ये (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. मात्र, गाळपाचे नियोजन आणि अधिकचा ऊस यामुळे ही परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उर्वरीत काळात कारखान्यांनाच योग्य ते नियोजन करुन गाळप करणे महत्वाचे आहे.

लांबलेल्या तोडणीचा नेमका काय परिणाम?

लागवडीपासून किमान 12 महिन्यात ऊसाचे गाळप झाले तर वजनही योग्य मिळते आणि साखरेचा उताराही चांगला मिळतो. त्यामुळे वेळेत तोड मिळावी ही शेतकऱ्यांची भूमिका राहिलेली आहे. परंतू, वेळेत तोड न झाल्यास ऊस पोकळ होण्यास सुरवात होते व त्यामधील ग्लुकोज व फ्रुक्टोजचे विघटन होत साखरेत रुपांतर होते. त्यामुळे साखरेचा उतारा हा कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित साखर कारखान्याचे नुकसान होतेच. शिवाय तोडणीला येऊनही दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटला तर मात्र, ऊस फडातच राहणार अशी भीती असते. त्यामुळे वेळेत गाळप हाच पर्याय असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

कशामुळे निर्माण झाली ही परस्थिती?

यंदा गाळप एकतर महिन्याभराने उशिरा सुरु झाला होता. यातच एफआरपी रक्कम रखडल्यामुळे अनेक साखर कारखान्यांना हंगामाच्या सुरवातीला परवानगीच मिळाली नाही. त्यामुळे आता हंगाम मध्यावर आला असताना साखर कारखान्यांकडे ऊस येण्याचा ओघ वाढला आहे. तर काही साखर कारखाने हे पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा या भागातील ऊस तोडणीअभावी वावरातच आहे. त्यामुळे त्याला तुरे लागत आहेत.

आता उरले दोन महिने

साखर आयुक्त कार्यालयाकडून यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी अनेक भागातील ऊस अद्यापही फडातच आहे. त्यामुळे रखडलेल्या ऊसाचे वेळेत नाही तर तोडच होते की नाही हा प्रश्न आहे. 15 ऑक्टोंबरपासून सुरु झालेले साखऱ कारखाने हे आता एप्रिलपर्यंत सुरु राहतील असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नियोजनासाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी राहिल्याने उर्वरीत ऊसाचे काय होणार हा प्रश्न कायम आहे.

संबंधित बातम्या :

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

शेतकऱ्यांनो सावधान..! बदलत्या वातावरणाचा गहू पिकावरही रोगराई, काय आहे उपाययोजना?

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे ‘शिवार’ फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम