Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?

Soybean Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांची भूमिका बदलली, आवक वाढली दराचे काय?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती

सोयाबीनच्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी विक्री की साठवणूक याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे घटत असलेल्या दराला आळा बसला असून 4 हजार 500 वरील सोयाबीन गेल्या तीन महिन्यांमध्ये 6 हजार 300 वर येऊन ठेपले होते. शेतकऱ्यांच्या एकजूटीच्या निर्णयाचा परिणाम कायम सोयाबीनच्या दरावर राहिलेला आहे. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता दर कमी असतानाही सोयाबीनची आवक ही वाढत आहे.

राजेंद्र खराडे

|

Jan 18, 2022 | 3:29 PM

लातूर : सोयाबीनच्या बदलत्या दरावरच शेतकऱ्यांनी विक्री की साठवणूक याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे घटत असलेल्या दराला आळा बसला असून 4 हजार 500 वरील (Soybean Rate) सोयाबीन गेल्या तीन महिन्यांमध्ये 6 हजार 300 वर येऊन ठेपले होते. शेतकऱ्यांच्या एकजूटीच्या निर्णयाचा परिणाम कायम सोयाबीनच्या दरावर राहिलेला आहे. मात्र, (Kharif Season) हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता दर कमी असतानाही सोयाबीनची आवक ही वाढत आहे. सरासरीप्रमाणे दर मिळत असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. तर दुसरीकडे साठवणूकीवर भर दिला तर उद्या उन्हाळी हंगामातील सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाले तर आहे तो दरही मिळणार नाही यामुळे दर स्थिर असतानाही (Latur) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही वाढत आहे. या आठवड्याच्या सुरवातीपासूनच आवक वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे हेच समीकरण हंगामाच्या शेवटपर्यंत राहणार हे पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील उडदाची आवक घटली असताना प्रथमच दरही 7 हजाराच्या खाली आले आहेत. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर, उडीद या खरीप हंगामातील पिकांची आवक सुरु आहे.

आवक 22 हजार पोत्यांची अन् दर 6 हजार 200 रुपये

दिवाळीनंतर दर वाढूनही कधी 20 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवक झाली नव्हती. पण आता दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर हे 6 हजार 200 वर स्थिरावले आहेत. दर घटल्यावर शेतकऱ्यांनी कायम आवक ही नियंत्रणात ठेवलेली आहे. पण आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात साठवणूक केलेल्या सोयाबीनची विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 हजार पोत्यांची आवक झाली असून 6 हजार 200 रुपये दर मिळाला आहे.

उडदाच्या दरात घसरण

सोयाबीनसह इतर शेतीमालाचे दर घसरले असताना केवळ उडदाने शेतकऱ्यांना आधार दिला होता. दिवाळीपुर्वी उडदाला 7 हजार 300 पर्यंत दर मिळाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून दरात घट झाली आहे. 6 हजार 600 रुपये क्विंटलवर उडदाचे दर आले आहेत. शिवाय आवकही कमी झाली आहे. सध्या नवीन तुरीची आवक सुरु झाली असून जुन्याच तुरीला अधिकचा दर आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकांची आवक वाढळ्यामुळे बाजारपेठेत वर्दळ निर्माण झाली आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6580 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6530 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6580 रुपये क्विंटल, जानकी चना 4880 रुपये क्विंटल, विजय चणा 4800, चना मिल 4600, सोयाबीन 6221, चमकी मूग 6880, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 6760 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो सावधान..! बदलत्या वातावरणाचा गहू पिकावरही रोगराई, काय आहे उपाययोजना?

कृषी विभागाची भूमिका बजावत आहे ‘शिवार’ फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम

तुरीचे दरही शेतकऱ्यांच्या भूमिकेवरच अवलंबून, सोयाबीन-कापूस नंतर होणार का मोहीम फत्ते?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें