खरिपातील ही दोन पिके बाजारात, कसे आहेत दर जाणुन घ्या…

| Updated on: Sep 13, 2021 | 2:22 PM

मूगाची आवक वाढल्याने काही प्रमाणात दर हे हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. तर मागणीनुसार उडीदाची आवक असल्याने हमी भावापेक्षा अधिकचा दर हा मिळत आहे. असे असले तरी पावसामुळे पिकाची खराबी झाली असून भविष्यात हेच दर कायम राहतील का हे देखील पहावे लागणार आहे.

खरिपातील ही दोन पिके बाजारात, कसे आहेत दर जाणुन घ्या...
संग्रहीत छाय़ाचित्र
Follow us on

लातुर : खरिपातील सोयाबीन हे मुख्य पिक हे वावरातच असले तरी उडीद आणि मूगाची आवक ही सुरु झाली आहे. मूगाची आवक वाढल्याने काही प्रमाणात दर हे हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. तर मागणीनुसार उडीदाची आवक असल्याने हमी भावापेक्षा अधिकचा दर हा मिळत आहे. असे असले तरी पावसामुळे पिकाची खराबी झाली असून भविष्यात हेच दर कायम राहतील का हे देखील पहावे लागणार आहे.
खरिपातील मूगाची आवक ही सर्वात आगोदर सुरु झाली आहे. पहिल्यात टप्प्यात आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर हे कमी झाले आहेत. केंद्र सरकारने मूगाला 7275 तर उडदाला 6300 एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मूगाची आवक वाढल्याने दर 50 ते 150 घसरले होते. लातुर बाजार समितीमध्ये मुगाला 6600 , आकोला येथे 7050 तर गेल्या आठवड्यात मुगाचे दर हे टिकून होते. काही ठिकाणी पाऊस येण्यापुर्वीच मूगाची काढणी ही झालेली होती तर आता उडदाची आवक ही घटल्याने दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.

लातुरला लागूनच असलेल्या बीदर बाजारात मूगाला 6000 ते 7000, हुबळी बाजारात 6000 ते 6800 दर मिळाला आहे. तर उडदाला 6500 ते 7400 दर मिळाला आहे. देशातील मुख्य बाजार पेठेत आवक आणि मालाच्या दर्जानुसार दर ठरु लागले आहेत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता कुठे उडदाची आवक सुरु झाली असुन आवक मर्यादीत असल्याने चांगला दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

राज्यातील मुख्य बाजार पेठेतील दर

उडदाची आवक सुरु झाली आहे पण याचे प्रमाण हे मर्यादीत असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. अकोला बाजार समितीत उडदाला 100, बार्शीत 200, दुधनी येते 100 आणि जळगाव येथे 200 रुपये अशी वाढ मिळाली आहे. त्यामुळे अकोला येथे 6000 ते 7400, बार्शीत 3500 ते 7200 जळगाव येथे 6000 ते 7700 तर दुधनी बाजार पेठेत 6500 ते 7400 असा दर मिळाला आहे.

अचानक सोयाबीनच्या दरात झाली होती उसळी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच 10 हजारावर गेलेले सोयाबीन 8 हजार प्रतिक्विंटवर आले होते. सोयाबीनच्या अनुशंगाने लातुरची बाजारपेठ ही महत्वाची मानली जाते. या बाजार समितीमध्येही 8 हजार ते 9 हजाराचा दर मिळत आहे. परंतु, हिंगोली बाजार समितीमध्ये विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता उंचावल्या आहेत. मात्र, रोज बदलणारी आवक, सोयाबीनचा दर्जा यावरच भविष्यातील दर अवलंबून आहेत.

नविन सोयाबीनची आवक सुरु

हंगामाच्या सुरुवातीला पेरा झालेले सोयाबीनची बाजारात आवक सुरु झाली आहे. याचे प्रमाण कमी असले तरी सोयाबीन हे डागाळलेले नाही. पाऊस येण्यापुर्वीच या पिकाची काढणी ही झालेली आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या सोयाबीनला अधिकचा दर मिळत आहे. these-two-crops-in-kharif-are-in-the-market-know-how-these-two-crops-rate-in-maharashtra-bajar-samiti

संबंधित इतर बातम्या :

आश्चर्य : वेताशिवाय 25 वर्षीय गाय देतेय दुध, कृषी तज्ञही झाले अवाक्

घरबसल्या मिळवा जमिनीच्या दाव्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ॲप सुरु

नुकासान भरपाई दूरच, शेतकरी-अधिकारी सुसंवाद नसल्याने सावळा गोंधळ, शेतकऱ्यांच्या बांधावर वेगळेच चित्र