शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरेदी केंद्रावर तूर विक्रीपूर्वी करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया

| Updated on: Dec 21, 2021 | 11:03 AM

तुरीला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने उशिरा का होईना नाफेडच्यावतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्यामार्फत खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. याकरिता नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. कारण विक्रीपूर्वी योग्य ती खबरदारी पणन महासंघाकडून घेतली जात असते.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरेदी केंद्रावर तूर विक्रीपूर्वी करावी लागणार ही प्रक्रिया
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : तुरीला हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने उशिरा का होईना नाफेडच्यावतीने ( State Government) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्यामार्फत (Guarantee Centre) खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. याकरिता नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. कारण विक्रीपूर्वी योग्य ती खबरदारी पणन महासंघाकडून घेतली जात असते. अन्यथा (Farmers) शेतकरी म्हणून अनेक वेळा व्यापारीही साठवलेला माल कमी दराने खरेदी करुन केंद्रावर विक्री करु शकतात. त्यामुळे सुरवातीला नाव नोंदणी करुनच पुन्हा प्रत्यक्षात खरेदीला सुरवात होणार आहे. तूरीची आवक बाजारपेठेत सुरु झाली आहे. खरेदी केंद्रावर 6 हजार 300 रुपये क्विंटलचा दर ठरवण्यात आला आहे. पण बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दर असल्याने त्वरीत केंद्र सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर त्या प्रक्रियेला सुरवात झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

नाव नोंदणी करताना या कागदपत्रांची करावी लागणार पूर्तता

सोमवारपासून राज्यातील खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पार पाडली जात आहे. सुरवातील शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार याकरिता 7/12 उतारा, 8 अ, पिकपेरा आणि बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स ही खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती ही नाफेडकडे राहणार आहे. त्यामुळे शेतीमालाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे सहज शक्य होणार आहे. तर पिकपेरा असल्याने शेतकऱ्याने किती क्षेत्रावर तूरीचे पीक घेतले आहे याची माहिती संबंधित विभागाकडे राहणार असल्याने अनियमितता होणार नाही.

15 दिवसांनी खात्यावर पैसे

खासगी व्यापाऱ्यांकडे शेतीमालाची विक्री केली तर सौदे झाले की पट्टी मिळते मात्र, खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या मालाच्या पैशाकरिता शेतकऱ्यांना 15 दिवस वाट पहावी लागणार आहे. मात्र, यामध्ये कोणी मध्यस्ती नाही तर थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यामध्ये काही समस्या उद्भवल्यास जिल्हा कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसण होणार आहे. सोमवारपासून नाव नोंदणीला सुरवात झाली असून बाजारभावापेक्षा हमीभाव अधिकचा असल्याने शेतकरी गर्दी करु लागले आहेत.

राज्यात 186 हमीभाव केंद्र

राज्यभरात 186 हमीभाव केंद्रावर तुरीची खरेदी केली जाणार आहे. सध्या प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झाली नसली तरी आवश्यक त्या प्रक्रिया पार पाडली जात आहे. शेतकऱ्यांना जवळच्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 जानेवारीपासून खरेदीला सुरवात होणार असल्याचे नाफेडचे बीडचे अधिकारी सुगठाने यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : सोयाबीनसह आठ शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, काय होणार दरावर परिणाम?

Rabi Season : गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच कार व्यवस्थापन अन्यथा होईल उत्पादनात घट

फरदड टाळा अन् आगामी हंगामातील उत्पादन वाढवा, कापूस उत्पादकांसाठी महत्वाची माहिती