Washim : ‘मिनी ऑरेंज सिटी’ मध्ये वाढणार फळबागेचे क्षेत्र, पोषक वातावरणामुळे वाशिममध्ये पीक पध्दतीमध्ये बदल

| Updated on: Jul 10, 2022 | 9:35 AM

पावसामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप कसे बदलते याची प्रचिती राज्यामध्ये येत आहे. गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या पेरण्या आता वेगात होत आहेत. तर उत्पन्न वाढीसाठी फळबागावरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा फळाचे क्षेत्र वाढले आहे. केवळ वनोजा शहर क्षेत्रातच नाही तर परिसरातील शेतकरीही आता संत्रा लागवडीवर भऱ देत आहे.

Washim : मिनी ऑरेंज सिटी मध्ये वाढणार फळबागेचे क्षेत्र, पोषक वातावरणामुळे वाशिममध्ये पीक पध्दतीमध्ये बदल
वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत शिवाय संत्रा फळबागांचे क्षेत्रही वाढत आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वाशिम : राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे केवळ (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांसाठीच पोषक वातावरण झाले असे नाही तर शेतीचे चित्रच बदलून गेले आहे. आतापर्यंत खरीप हंगामातील सरासरी एवढा तरी पेरा होणार की नाही अशी शंका होती मात्र, गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे (Orchard area) फळबागेचेही क्षेत्र वाढणार आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा हे मिनी (Orange City) ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रावर तर संत्रा लागवड होतच आहे पण लगतच्या भागातील शेतकऱ्यांनी संत्रा लागवडीला पसंती दिली आहे. त्यामुळे केवळ खरिपाचाचे नाहीतर शेतीचे चित्र बदलत आहे. खरीप हंगामातील पिकांमध्ये आंतरपिक म्हणून संत्राची लागवड केली जात आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

पावसामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप कसे बदलते याची प्रचिती राज्यामध्ये येत आहे. गेल्या महिन्याभरापासून रखडलेल्या पेरण्या आता वेगात होत आहेत. तर उत्पन्न वाढीसाठी फळबागावरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा फळाचे क्षेत्र वाढले आहे. केवळ वनोजा शहर क्षेत्रातच नाही तर परिसरातील शेतकरीही आता संत्रा लागवडीवर भऱ देत आहे. पावसामुळे जमिनीतील ओल आणि वाढीसाठी पोषक वातावरण झाले आहे. त्यामुळे कलम केलेल्या रोपांची लागवड केली जात आहे.

वनोजा आदर्श गाव, इतर शेतकऱ्यांनाही फायदा

वाशिम जिल्ह्यातील वनोजा हे आदर्श गाव आहे. फळबाग क्षेत्रातील योगदान आणि संत्रा फळाचा दर्जा उत्तम असल्याने या गावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. संत्रा फळबागा मोठ्या प्रमाणावर असुन शेतकरी संत्रा उत्पादनही चांगल्या प्रकारे घेतात. त्यामुळे परिसरतील ईतर शेतकरीही संत्रा फळबागे कडे वळताना दिसत आहेत. आता खरिपातील पेरण्या झाल्या असून या पिकांमध्येच आंतरपिक म्हणून संत्राची लागवड केली जात आहे. पडत्या पावसामध्ये शेतकरी हे काम करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

अशी करा लागवड

संत्र्याची कलमे मान्सूनचा 3 ते 4 वेळा पाऊस पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लावावीत. कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्डयात पुरेशी ओल असताना लावावीत. कलमांचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचा संभाव नसतो. शेतकऱ्यांच्या या अनोखा प्रयोगाला कृषी विभागाचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांबरोबर शेतकरी हे फळबागाचेही उत्पादन घेत आहेत.