Latur: लातूरमध्ये 11 साखर कारखाने तरीही शेतकऱ्यांचा ऊस फडातच, नुकसानीला जबाबदार कोण?

| Updated on: Feb 20, 2022 | 4:57 PM

जिल्ह्यात शाश्वत पाणी नसले तरी मात्र, ऊसाच्या क्षेत्रात वर्षागणिस वाढ होत आहे. मांजरा नदीकाठचा भाग तर ग्रीन बेल्ट म्हणूनच ओळखला जात आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर साखर कारखान्यांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस हा फडातच तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या साखर कारखान्यावर अशीच अवस्था आहे. लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. तरच ऊसाचे वजन आणि दर याचा समतोल राखला जातो. पण आता 14 महिने उलटूनही ऊस शेतातच असल्याने उत्पादनात घट होणार आहे.

Latur: लातूरमध्ये 11 साखर कारखाने तरीही शेतकऱ्यांचा ऊस फडातच, नुकसानीला जबाबदार कोण?
अतिरिक्त ऊसाच्या क्षेत्राची नोंद करण्याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. बीडमध्ये याला सुरवात झाली आहे.
Follow us on

लातूर : जिल्ह्यात शाश्वत पाणी नसले तरी मात्र, (Sugarcane Area) ऊसाच्या क्षेत्रात वर्षागणिस वाढ होत आहे. मांजरा नदीकाठचा भाग तर ग्रीन बेल्ट म्हणूनच ओळखला जात आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर साखर कारखान्यांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस हा फडातच तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस (Latur District) लातूरच्या साखर कारखान्यावर अशीच अवस्था आहे. लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये (Sugarcane crushing) ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. तरच ऊसाचे वजन आणि दर याचा समतोल राखला जातो. पण आता 14 महिने उलटूनही ऊस शेतातच असल्याने उत्पादनात घट होणार आहे. कारखान्याकडे नोंदी करुनही वेळेत तोड होत नाही याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. आतापर्यंत पोषक वातावरण नव्हते म्हणून ऊसाचे क्षेत्र हे घटलेले होते पण गेल्या चार वर्षापासून क्षेत्र वाढूनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

गेटकेन ऊसालाच अधिकचे प्राधान्य

साखर कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीलाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण साखर कारखाने अर्थर्जानाचा विचार करुन जे सभासदही नाहीत अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस फडात आणि इतर जिल्ह्यातील ऊसाचे गाळप लातूरात अशी अवस्था आहे. यंदा गाळप हंगाम जोमात झाला असून कारखान्यांचे उद्दीष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असून ऊसाची तोड होणार की नाही हा प्रश्न आहे.

लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने

लातूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामात 11 साखर कारखान्यांचे गाळप हे सुरु होते. यामध्ये मांजरा विकास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, पणगेश्वर साखर कारखाना, सिद्धी सहकारी साखर कारखाना, ट्वेंटीवन 01, ट्वेंटीवन 02, जागृती सहकारी साखर कारखाना, किल्लारी साखर कारखाना, मारोती महाराज सहकारी साखर कारखाना, औसा तालुक्यातील गोंदरी साखर कारखाना, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर यांचा समावेश आहे. असे असताना हजारो हेक्टरावरील ऊस अजूनही फडातच आहे.

साखर आयुक्तांच्या सूचनांचे होणार का पालन

15 ऑक्टोंबर पासून यंदा ऊस गाळप हंगाम सुरु झाला होता. आता चार महिन्यांमध्ये गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. गाळपाचे प्रमाण वाढले असले तरी अनेक शेतकऱ्यांचा ऊस अजूनही तोडणीअभावी वावरातच आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हंगाम सुरु राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रावरील ऊसाची तोड होणार की नाही याबाबत साशंका आहे. पण साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कार्यक्षेत्र तसेच लगतच्या भागातील ऊसाची तोड झाल्याशिवाय गाळप बंद करु नये असे आदेश कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे आदेशाचे पालन झाले तरी ऊस कारखान्यावर जाईल पण घटत्या उत्पादनाचे काय हा सवाल कायम आहे.

संबंधित बातम्या :

शेतकरी उत्पादक कंपन्यामुळेच भारत बाजरी उत्पादनात जगाच्या केंद्रस्थानी, केंद्र सरकारचे कंपन्यांना पाठबळ

शेती उत्पादनवाढीसाठी ‘जीएम’ वाणांशिवाय पर्याय नाही, काय आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ठिबक संच बसवला आता अुनदानही खात्यावर होणार जमा, लाखो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात