PM Kisan: बँक खात्यात केव्हा येणार 2000 रुपये? वाचली की नवीन अपडेट?
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जून महिन्यात जमा होणार असे म्हटले जात होते. पण आता नवीन अपडेट समोर आली आहे. त्यानुसार या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.

PM Kisan Yojana 23rd Instalment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी शेतकर्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेतील 23 वा हप्ता जून महिन्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी दौऱ्यावर असताना 22 वा हप्ता जमा केला होता. त्यावेळी देशभरातली 9.3 कोटींहून अधिक शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम (DBT) जमा करण्यात आली होती. आता पुढील हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
कोणत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसा?
पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकर्यांच्या खात्यात एकूण 6,000 रुपये तीन टप्प्यात जमा करण्यात येतात. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै या दरम्यान जमा होतो. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात दुसरा हप्ता जमा करण्यात येतो. तर डिसेंबर ते मार्च महिन्यात तिसरा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा होतो. 22 वा हप्ता मार्च 2026 मध्ये करण्यात आला होता. त्यामुळे 23 वा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
अगोदर हे काम करा
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन महिन्यात जमा होईल. लाभार्थ्यांच्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा होतील. या योजनेच्या खात्यात नाव आहे की नाही शेतकऱ्यांना घरबसल्या तपासता येईल.
यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. साईटवर शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडा. लाभार्थ्यांची यादी तपासा. याठिकाणी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, खाते क्रमांक टाकावा. आता “Get Data” वर क्लिक करुन लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक केल्यास संपूर्ण माहिती समोर येईल.
ई-केवायसी पूर्ण केली असेल तर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा होईल. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्यांना 1800-115-5525 या हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क कराता येईल. या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.
तर नाही मिळणार हप्ता
बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने काही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. सातत्याने काही प्रक्रिया कराव्या लागतात. जे शेतकरी ई-केवायसी(e-KYC) आणि भू-सत्यापन (Land Verification) सारखी प्रक्रिया दरवेळी पूर्ण करत नाही. त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा होत नाही. तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, केवायसी अपूर्ण असेल तर जुलै महिन्यात हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये असे आवाहन करण्यात येते.