Cotton Crop : पुन्हा पांढऱ्या सोन्याने बहरणार शिवार, घटलेले क्षेत्र कशामुळे वाढणार?

| Updated on: Mar 26, 2022 | 10:06 AM

कापसाचे घटलेले दर आणि बोंडअळीमुळे शेतजमिन नापिकी अशा एक ना अनेक समस्यांमुळे कापसाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत होते. मराठवाड्यासह विदर्भात खरीप हंगामात कापूस हे मुख्य पीक होते. मात्र, गेल्या 5 वर्षामध्ये परस्थिती बदलली होती. पण विक्रमी दरामुळे काय होऊ शकते याचा प्रत्यय आता आगामी खरिपात येणार आहे. कारण गेल्या 50 वर्षात जे घडलं नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत झालं आहे.

Cotton Crop : पुन्हा पांढऱ्या सोन्याने बहरणार शिवार, घटलेले क्षेत्र कशामुळे वाढणार?
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : (Cotton Crop) कापसाचे घटलेले दर आणि बोंडअळीमुळे शेतजमिन नापिकी अशा एक ना अनेक समस्यांमुळे (Cotton Area) कापसाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत होते. मराठवाड्यासह विदर्भात (Kharif Season) खरीप हंगामात कापूस हे मुख्य पीक होते. मात्र, गेल्या 5 वर्षामध्ये परस्थिती बदलली होती. पण विक्रमी दरामुळे काय होऊ शकते याचा प्रत्यय आता आगामी खरिपात येणार आहे. कारण गेल्या 50 वर्षात जे घडलं नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत झालं आहे. कापसाला यंदा 12 हजार रुपये क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे आगामी खरिपात देशात तब्बल 10 लाख हेक्टराने क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. म्हणजेच घटलेले क्षेत्र पुन्हा सावरणार असल्याचे चित्र पाहवयास मिळणार आहे.

11 राज्यांमध्ये कापसाची लागवड

देशातील 11 राज्यांमध्ये तब्बल 130 लाख हेक्टरावर कापसाचे सरासरी क्षेत्र आहे. पण गेल्या 5 वर्षांमध्ये यामध्ये 10 लाख हेक्टराने घट झाली होती. कापूस उत्पादनात महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, राजस्थान, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा अशा 11 राज्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात सरासरी क्षेत्र हे 40 लाख हेक्टर असताना गतवर्षी 35 लाख हेक्टरावर लागवड झाली होती. तर दुसरीकडे कापूस या मुख्य पिकाची जागा ही सोयाबीनने घेतली आहे. सोयाबीनच्या वाढत्या क्षेत्राचाच फटका कापसाला बसलेला होता. मात्र, उत्पादन घटले असल्याने यंदा विक्रमी दर मिळाला असून याचा परिणाम आगामी हंगामावर होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

यापूर्वी सोयाबीनमुळेच घटले होते क्षेत्र

पीक पध्दतीमध्ये बदल हा शेतकऱ्यांकडून केला जातो. ज्याला अधिकचा दर त्यावरच शेतकऱ्यांचा कायम भर राहिलेला होता. यापूर्वी सोयाबीनचे दर वाढले होते तर कापसामुळे शेतजमिनीचा खराबा आणि दिवसेंदिवस उत्पादनात घट अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कापसाची जागा सोयाबीनने भरुन काढली. म्हणूनच सोयाबीन हेच खरीप हंगामातील मुख्य पीक झाले आहे. आता दरात झालेल्या बदलामुळे शेतकरी पुन्हा आपला विचार बदलतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. किमान यंदा सरासरीचा टप्पा तरी कापूस गाठेल असा अंदाज आहे.

अकोट बाजार समितीमध्ये 12 हजाराचा दर

अकोला जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक होते. मात्र, काळाच्या ओघात येथील शेतकऱ्यांनीही पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. मात्र, जिल्ह्यातील अकोट ही कापूस बाजारपेठेचे महत्व कायम होते. यंदा या बाजार समितीमध्ये 12 हजाराचा दर मिळाला आहे. त्यामुळे पु्न्हा जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कापसाची लागवड होते. त्यानुसार बाजारपेठेत बियाणे उपलब्ध होऊ लागले आहे.

संबंधित बातम्या :

PM kisan Yojna : शेतकऱ्यांना दिलासा, e-KYC बाबत सरकारचा मोठा निर्णय..!

Cotton Rate | अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी भाव, कापसाला मिळाला 12 हजार रुपये Rate

बैलगाडा शर्यतीच्या परवानगीमुळे संस्कृतीचे जतन अन् ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीही