यशोगाथा ! दूध विक्रीतून लाखोंची कमाई, पुरुषांनाही महिला भारी

| Updated on: Oct 09, 2021 | 12:50 PM

महिलांनी दुध विकून वर्षाकाठी कोट्यावधी रुपये कमावले आहेत. त्यामुळे महिला (milk business ) दुध व्यवसयात ह्या परुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. या व्यवसयातून केवळ उत्पादनच नाही तर अनेक महिलांच्या हातालाही काम मिळालेले आहे. 'अमूल' अशा यशस्वी 10 महिलांची नावे जाहीर केली आहेत. ज्यांची कमाई ही वर्षाकाठी कोट्यावधींची आहे. गुजरात मधील या महिलांच्या यशोगातेमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.

यशोगाथा ! दूध विक्रीतून लाखोंची कमाई, पुरुषांनाही महिला भारी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : शेती या मुख्य व्यवसायाला जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. मात्र, याच जोडव्यवसयात सातत्य आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबवल्यास काय होते हे गुजरात (Gujrat) येथील महिलांनी दाखवून दिलेले आहे. येथील महिलांनी दूध विकून वर्षाकाठी कोट्यावधी रुपये कमावले आहेत. त्यामुळे महिला (milk business ) दूध व्यवसयात ह्या परुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. या व्यवसयातून केवळ उत्पादनच नाही तर अनेक महिलांच्या हातालाही काम मिळालेले आहे. ‘अमूल’ अशा यशस्वी 10 महिलांची नावे जाहीर केली आहेत. ज्यांची कमाई ही वर्षाकाठी कोट्यावधींची आहे. गुजरात मधील या महिलांच्या यशोगातेमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.

फक्त दूधाचाच व्यवसाय असा आहे ज्याची मागणी कधीच कमी होत नाही. दूध किंवा त्यापासून तयार होणारे पदार्थ हे दोन्हीही व्यवसाय असे आहेत जे कधीही अपयशी ठरत नाही. दूध व्यवसायातील यशाबद्दल केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियाही आता पुढे येत आहेत. अमूल डेअरीने गुजरातमधील 10 महिलांची यादी जाहीर केली आहे. ज्यांनी दूध विक्रीतून लाखो रुपयांची कमाई केलेली आहे. याबाबत अमूल डेअरीचे अध्यक्ष आर.एस. सोधी यांनीच ही माहिती दिली असून या महिला गुजरात मधील आहेत. केवळ महिलांनी लाखोंची कमाईच केली नाही तर अनेकांच्या हाताला कामही दिलेले आहे.

दूध व्यवसायाला वेगळे स्वरुप

दूध व्यवसाय हा केवळ शेतीला पुरक व्यवसाय ही संकल्पना आता काळाच्या ओघात बदलेली आहे. कारण दूध व्यवसायालाच अधिकचे महत्व दिले जात आहे. केवळ पुरुषांनीच हा व्यवसाय करावा असे नाही तर महिलांनीही वेगवेगळे अभिनव प्रयोग यामध्ये केलेले आहेत. गुजरातमधील महिला याचे उत्तम उदाहरण आहेत. या महिलांनी केवळ व्यवसायाला सुरवातच केली नाही तर पुरुषांपेक्षा हा व्यवसाय अधिक उत्तारित्या करून दाखवलेला आहे. त्यामुळेच अमूल डेअरीने याची दखल घेतली आहे.

अनेक महिलांसाठी प्रेरणादायी काम

महिला आता कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत. शेती कमामध्येही पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून त्या राबत आहेत. एवढेच नाही तर अधिकचे उत्पादन घेऊन शेती व्यवसायातही प्रगती करीत आहेत. अशातच गुजरातमधील 10 महिलांनी तर दूध व्यवसयातून लाखोंची कमाई केलेली आहे. हे काम उतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

या आहेत यशस्वी महिला

अमूलने दूध व्यवसयात भरघोस उत्पादन घेणाऱ्या महिलांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये पहिला क्रमांक आहे तो चौधरी नवलबेन यांचा. नवलबेन यांनी गेल्या वर्षी 2,21,595 लिटर दूध विकून 87.95 लाख रुपयांची कमाई केली. तर केवळ कमाईच नाही तर यामधून इतर महिलांच्या हाताला कामही दिले आहे.

2) मालवी कानुबेन रावताभाई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2,50745 लिटर दूध विकून 73.56 लाख रुपयांची कमाई केली. छवडा हनसाबा हिममत सिंग यांनी 72.19 लाख रुपयांची कमाई करून तिसरे स्थान मिळविले आहे.

लोह गंगाबेन गणेशभाई या चौथ्या क्रमांकावर आहेत. सुमारे 2 लाख लिटर दूध विकून त्यांने 64.46 लाख रुपयांची कमाई केली आहे. रावबरी देविकाबेन पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 1.79 लाख लिटर दुधातून 62.20 लाख रुपये कमावले आहेत. लीलाबेन राजपूत या यादीत सहाव्या स्थानावर आहे. दूध विकून त्याने 60.87 लाख रुपयांची कमाई केली आहे. बिस्मिल्लाबेन उमतियाने 58.10 लाख रुपयांची कमाई करून 7 वे स्थान निश्चित केले आहे.

आठव्या क्रमांकावर साजीबेन चौधरी आहेत. साजीबेनने अमूलला 196862.6 लिटर दूध विकले आणि त्या बदल्यात 56.63 लाख रुपयांची कमाई केली. नफिसाबेन अगलाडिया यांनी दुधातून 53.66 रुपये कमावून नववे स्थान मिळविले आहे. तर 10 वी लीलाबेन धुलिया होती, ज्याने 1792274.5 लिटर दूध उत्पादन करीत 52,02,396.82 रुपये कमावले आहेत. (Women’s Success Story: Millions earned from milk business, men also surpassed)

संबंधित बातम्या :

तयारी रब्बी हंगामाची : हरभरा या मुख्य पीकावर भर, जाणून घ्या पेरणी ते काढणीपर्यंतची प्रक्रिया

नोकरीची चिंता सोडा आणि ‘हा’ व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान, महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न

पाकिस्तानला दे धक्का ! भारतीय रताैल आंब्यालाच ‘जीआय टॅग’ प्रदान