तयारी रब्बी हंगामाची : हरभरा या मुख्य पीकावर भर, जाणून घ्या पेरणी ते काढणीपर्यंतची प्रक्रिया

खरीपात मुख्य पीक हे सोयाबीन तर रब्बीतील हरभरा हे आहे. त्यामुळे खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्यासाठी पोषक वातावरणही झाले आहे. हरभऱ्याच्या पीकावरच शेतकऱ्यांनाही भर द्यावा हेच कृषी विभागाचेही धोरण आहे. मात्र, पेरणी ते काढणी दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती आज आपण घेणार आहोत

तयारी रब्बी हंगामाची : हरभरा या मुख्य पीकावर भर, जाणून घ्या पेरणी ते काढणीपर्यंतची प्रक्रिया
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 10:38 AM

लातूर : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. पावसाने यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी रब्बी हंगामाच्या तयारीला बळीराजा लागलेला आहे. खरीपात मुख्य पीक हे सोयाबीन तर रब्बीतील (Rabbi Hangam) हरभरा हे आहे. त्यामुळे खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्यासाठी पोषक वातावरणही झाले आहे. हरभऱ्याच्या पीकावरच शेतकऱ्यांनाही भर द्यावा हेच कृषी विभागाचेही धोरण आहे. मात्र, पेरणी ते काढणी दरम्यान शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती आज आपण घेणार आहोत…

काळाच्या ओघात पीकपध्दतीमध्ये बदल होत असले तरी हरभरा हे रब्बी हंगमातील मुख्य पीक आहे. तसेच कोरडवाहू जमिनीवरही हे पीक जोमात येते. महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाखाली 3.01 लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन 2.52 लाख टन होते. हे राज्याच्या या पिकाखालील क्षेत्र च्या सुमारे 27 टक्के इतके आहे. आता हे पीक केवळ पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच मर्यादीत राहिलेले नाही. मराठवाड्यातही हरभऱ्याचे क्षेत्र हे वाढत आहे.

जमीन व पूर्वमशागत

हरभऱ्यासाठी हलक्या किंवा कसदार जमिन नव्हे तर मध्यम ते पाण्याचा निचरा होणारी जमिन निवडणे आवश्यक आहे. हलक्या अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभ-यासाठी निवडू नये. तसेच पेरणीपूर्व मशागत ही महत्वाची आहे. खरीपाचे पीक निघाल्यानंतर हरभरा पेरणीच्या क्षेत्रावर नांगरन आवश्यक आहे. शिवाय कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन शेणखत जमीनीमध्ये मिसळावे. या प्रमाणे ऑक्टोंबरमध्ये पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

पेरणीची योग्य वेळ

हरभरा हे रबी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये 1 ऑक्टोंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करणे आवश्यक आहे. बागायती क्षेत्रावर ओल टिकून राहते. त्यामुळे हरभरा 20 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यासही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेता येते.

आंतरमशागत कधी व कशाप्रकारे करावी

आता पीक उगण्यापूर्वीच तणनाशक हे फवारले जाते. त्यामुळे भविष्यातही जास्त तण उगवत नाही. पीक उगवणीपूर्वी तणनाशकाचा वापर करायचा असल्यास पेंडिमिथीलीन 5 लीटर एक हेक्टर क्षेत्राकरिता 5000 लीटर पाण्यामध्ये मिसळून अंकूर जमिनीच्या पृष्ठभागावर येण्याआधी फवारावे. पीकामध्ये तण नसेल तर पिकाचे वाढ ही जोमात होते. त्यामुळे सुरवातीपासूनच शेत हे तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर जर खूरपणी केला तर पीक वाढीसाठी अधिकचा फायदा होणार आहे.

पाण्याचे व्यवस्थापन

पेरणीचा आणि पिक उगवण्याचा काळात थंडी असते. त्यामुळे हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील आहे. हरभरा पिकाला साधारणपणे 25 सेमी पाणी लागते. म्हणजे पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होते. 45 ते 50 दिवसांनी दुसरे पाणी आणि आवश्यकता वाटल्यास तिसरे पाणी 65-70 दिवसांनी द्यावे. कोरडेवारे जास्त प्रमाणात असल्यास ओल उडून जाते. त्यामुळे पीकाची पाहणी करून योग्य वेळी आवश्यकतेनुसार पाणी देणे गरजेचे आहे.

किड-रोगराईपासून पीकाचे संरक्षण

हरभरा पीक हे 3 आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. त्याला घाटेअळीमुळे असे म्हणतात. या अळीच्या प्रादुर्भावामुळे 30 ते 40 टक्के नुकसान होते. यामुळे पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. अशावेळी लिंबोळीच्या 5 टक्के द्रावणाची एक फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अळीचा बंदोबस्त होतो. यानंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी केल्याने किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते.

हरभरा पीकाची काढणी

हरभरा हे 100 ते 110 दिवसांचे पीक आहे. हे पीक ओलसर असतना याची काढणी करु नये. अन्य़था हरभऱ्यावर याचा परिणाम होतो. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभ-याची काढणी करुन मळणी करावी. यानंतर हरभऱ्याला हे 5-6 दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही. पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य ती काळजी घेतली तर हेक्टरी 25 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे. (Preparations for the rabi season; The emphasis of the farmers will be on the main crop of gram, information about sowing.)

संबंधित बातम्या :

नोकरीची चिंता सोडा आणि ‘हा’ व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान, महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न

ऊसाची FRP एकरकमीच मिळणार, पिषुय गोयल यांचं सदाभाऊ खोतांना आश्वासन

कधी थांबणार विजांचा थयथयाट? औरंगाबादेत 15 जनावरं दगावली, आकाशात गडगडाट अन् गावात भयाण शांतता

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.