AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळचा आढावा : यवतमाळमध्ये भाकरी फिरणार की कायम राहणार?

यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. यामध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे आहे.

यवतमाळचा आढावा : यवतमाळमध्ये भाकरी फिरणार की कायम राहणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 06, 2019 | 5:38 PM
Share

यवतमाळ :  यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. यामध्ये 5 भाजपकडे, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीकडे आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भेटीगाठी सुरु आहेत. जिल्ह्यात भाजप विकास कामावर मतं मागत आहेत, तर विरोधीपक्ष भाजपच्या कारभारावर. 7 विधानसभा असलेला यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा जिल्हा आहे. हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच बोलबाला होता. अनेक दिग्ग्ज नेते या जिल्ह्याने दिले. शिवाय दोनवेळा मुख्यमंत्रीपद नाईक घराण्याच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला मिळाले.  मात्र 2014 मधील निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेस भुईसपाट झाली.

जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, राळेगाव, उमरखेड आणि आर्णी या 5 ठिकणी भाजपचे, तर दिग्रसमध्ये शिवसेना आणि पुसदमध्ये राष्ट्रवादी असे  पक्षीय बलाबल आहे.

यवमाळ विधानसभा मतदारसंघ (Yavatmal Vidhansabha)

यवतमाळ विधानसभेचा विचार केला तर पालकमंत्री मदन येरावार यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढल्याने तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी अवघ्या 1227 मतांच्या फरकाने भाजपचे मदन येरावार विजयी झाले. त्यांना 53 हजार 671 मते मिळाली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या संतोष ढवळे यांनी जबरदस्त टक्कर दिली होती. तर बसपकडून निवडणूक लढविलेले तारिक लोखंडवाला  तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे हे तब्बल चौथ्या क्रमांकावर होते.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बसपाकडून निवडणूक लढविलेले तारिक लोखंडवाला हे राष्ट्रवादीच्या गटात सामील झाले असून, ते यवतमाळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरिया हे सुद्धा इच्छुक आहेत.

काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

तिकडे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून विपीन चौधरी या नवख्या तरुणाला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे.

वणी विधानसभा मतदारसंघ (Wani Assembly )

 जिल्ह्यातील दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणून वणी विधानसभेकडे पाहिलं जातं. ब्लॅक डायमंड सिटी असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजीव रेड्डी बोदकुलवार हे विद्यमान आमदार आहेत. मागील निडणुकीत 45 हजार मते घेऊन 5 हजाराच्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या विश्वास नांदेकर यांचा पराभव केला होता. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

या मतदारसंघात मनसेचीही ताकद आहे. मनसेचे राजू उंबरकर विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ आधी काँग्रेसचा गड होता, त्यानंतर शिवसेनेच्या हाती गेला. मग 2014 च्या निवडणुकीत भाजपने इथे विजय मिळवला. आता 2019 मध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीत हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो, त्यानुसार या ठिकाणची राजकीय परिस्थिती अवलंबून आहे.

दिग्रस विधानसभा (Digras Vidhan sabha constituency)

या मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड विद्यमान आमदार आहेत. दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा मतदारसंघ होता. मात्र 15 वर्षांपासून हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा हा मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत संजय राठोड यांना 1 लाख 21 हजार मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील वसंत घुईखेडकर हे 41 हजार 352 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. संजय राठोड यांचं मताधिक्य 80 हजार इतकं होतं.

या मतदारसंघात बंजारा समाज मोठ्याप्रमाणात आहे. सध्या तरी संजय राठोड यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडे प्रबळ दावेदार नसल्याचे चित्र आहे.

राळेगाव विधानसभा (Ralegaon vidhan sabha constituency)

राळेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे  विद्यमान कॅबिनेट मंत्री अशोक उईके हे प्रतिनिधीत्व करतात. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री वसंत पुरके यांचा पराभव केला. आता पुरके यांनी उईकेंकडून मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र उईकेंच्या वाढत्या आलेखाने काँग्रेसला निवडणूक सोपी नाही असे चित्र सध्या या मतदारसंघात आहे.

  पुसद विधानसभा (Pusad Vidhan sabha)

 नाईक घराण्याचे कायम प्राबल्य असलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात कायम नाईक परिवाराची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे मनोहर नाईक हे विद्यमान आमदार आहेत. सध्या याच नाईक परिवाराच्या शिवबंधन बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. नाईक म्हणजे पुसद आणि पुसद म्हणजे नाईक असे समीकरण इथे पाहायला मिळतं. नाईकांनी जर पक्षांतर केलं, तर या ठिकाणी विरोधीपक्ष आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

आर्णी विधानसभा (Arni Assembly)

आर्णी  विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे राजू तोडसाम विद्यमान आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव  केला होता.  भाजपने या मतदारसंघात झेंडा रोवला, मात्र भाजप आमदार तोडसाम यांच्या व्यक्तिगत काही प्रकरणांमुळे  त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. मात्र काँग्रेसला तोडसाम यांचा पराभव  करणे कठीण आहे. आदिवासी राखीव या मतदारसंघात भाजप पुन्हा निवडून येते की काँग्रेस बाजी मारेल, हे निवडणूक निकाला नंतरच स्पष्ट होईल. मात्र या मतदारसंघात काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.

उमरखेड विधानसभा (Umarkhed vidhan sabha)

उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र नजरधने विद्यमान आमदार आहेत. येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा निवडून आलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही.

प्रत्येकवेळी भाकरी परतल्याचे  उदाहरण या मतदारसंघात पाहायला मिळते. मात्र यंदा हा विक्रम मोडणार की कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच