मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त SUV कार S-Presso लाँच, किंमत फक्त...

मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित सर्वात स्वस्त एसयूव्ही कार S-Presso भारतात अखेर लाँच झाली आहे (Maruti Suzuki S-Presso). दिल्लीमध्ये या गाडीची एक्स-शोरुम किंमत 3.69 लाख रुपये आहे, तर याच्या हाय व्हर्जनची किंमत 4.91 लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त SUV कार S-Presso लाँच, किंमत फक्त...

मुंबई : मारुती सुझुकीची बहुप्रतिक्षित सर्वात स्वस्त एसयूव्ही कार S-Presso भारतात अखेर लाँच झाली आहे (Maruti Suzuki S-Presso). दिल्लीमध्ये या गाडीची एक्स-शोरुम किंमत 3.69 लाख रुपये आहे, तर याच्या हाय व्हर्जनची किंमत 4.91 लाख रुपयांपर्यंत आहे. सध्या ही गाडी फक्त पेट्रोल इंजिनसोबत बाजारात उपलब्ध आहे (S-Presso Launch).

Maruti S-Presso ही चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Standard, LXI, VXI आणि VXI+ यांचा समावेश आहे. या गाडीत 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. S-Presso च्या कॉन्सेप्टला 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती फ्युचर-एस या नावाने दर्शवण्यात आलं होतं.

आर्थिक मंदीच्या काळात ही स्वस्त मिनी SUV लोकांच्या पसंतीस पडेल, असं कंपनीला . तर जानकारांच्या मते, बाजारात या गाडीची रेनॉ क्विडशी सरळ स्पर्धा असेल.

फीचर्स :

मारुती एस-प्रेसोचं समोरचं लूक खूप बोल्ड आहे. यामध्ये हाय बोनट लाईन, क्रोम ग्रील आणि मोठे हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. एलईडी डीआरएल हेडलाईटच्या खाली आहे. फ्रंट आणि रिअर बंपर मोठा आहे. मारुतीची ही लहान कार 6 रंगात उपलब्ध आहे. दिसायला ही गाडी लहान असली तरी कुठल्या SUV पेक्षा कमी नाही. एस-प्रेसोला मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

मारुती सुझुकीच्या ‘या’ कारच्या किंमतीत दीड लाखांची कपात

मारुतीच्या स्विफ्ट, ऑल्टोसह 10 गाड्यांच्या किंमतीत घट

गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही

Tata Motors Altroz : लाँचपूर्वीच फोटो लीक, पाहा कशी असेल टाटाची अल्ट्रोझ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *