AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यू जनरेशन Bajaj Pulsar 250 मध्ये मिळणार 5 नवे फीचर्स, लाँचिंगआधीच जाणून घ्या बाईकची खासियत

बजाज ऑटो आपली नवीन मोटरसायकल भारतीय दुचाकी बाजारात सादर करणार आहे. न्यू जनरेशन बजाज पल्सर 250 असे या बाईकचे नाव आहे.

न्यू जनरेशन Bajaj Pulsar 250 मध्ये मिळणार 5 नवे फीचर्स, लाँचिंगआधीच जाणून घ्या बाईकची खासियत
बजाज बाईक (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 4:51 PM
Share

मुंबई : बजाज ऑटो आपली नवीन मोटरसायकल भारतीय दुचाकी बाजारात सादर करणार आहे. न्यू जनरेशन बजाज पल्सर 250 असे या बाईकचे नाव आहे. या बाईकची विक्री भारतात 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल. ही मोटारसायकल भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान नुकतीच पाहायला मिळाली. यावेळी बाईकचे काही फीचर्स उघड झाले आहेत. अलीकडेच या बाईकचे दोन व्हेरिएंट सोशल मीडिया आणि इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, जे NS250 आणि 250F सारखे असू शकतात. दरम्यान, या बाईकचे 5 खास फीचर्स उघड झाले आहेत. चला तर मग दुचाकीची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया. (2021 Bajaj Pulsar 250 to launch in India on October 28, 5 new feature you should know)

याआधी, राजीव बजाज यांनी पुष्टी केली होती की कंपनी आपल्या सर्वात मोठ्या पल्सरसह नवीन प्लॅटफॉर्मवरुन पडदा हटवणार आहे. मात्र, त्यांनी नवीन मॉडेलचे नाव आणि तपशील शेअर केला नाही. परंतु असे सांगितले जात आहे की, ते नवीन 2021 Bajaj Pulsar 250 (2021 बजाज पल्सर 250) बद्दल बोलत असावेत. या बाईकच्या डिझाइनमध्ये मोठे बदल दिसतील.

1. प्रोजेक्टर हेडलॅम्प

न्यू जनरेशन पल्सरमध्ये प्रोजेक्टर लॅम्प हेडलॅम्प असतील, जे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अधिक स्पष्टता देतीलच, परंतु बाईकला अधिक चांगला लूक देतील. हे हेडलॅम्प एका विशिष्ट प्रकारात लाँच केले जाऊ शकतात.

2. एलईडी इंडिकेटर

बजाजच्या या आगामी बाईकमध्ये स्लीक एलईडी इंडिकेटर्स दिसतील. हे इंडिकेटर्स आतापर्यंत पल्सर बाईकमध्ये उपस्थित असलेल्या इंडिकेटर्सपेक्षा वेगळे असतील. यामुळे नवीन पल्सरला नवीन लूक मिळेल.

3. डिस्क ब्रेकसह अलॉय व्हील्स

न्यू जनरेशन बजाज पल्सरवरुन असे दिसतेय की, या बाईकमध्ये आतापर्यंतचे सर्वात नवीन अलॉय व्हील्स यात मिळतील. जे आकर्षक डिझाईनसह ट्यूबलेस आणि रॅडियल टायर्सना सपोर्ट करतील.

4. एयर-कूल्ड

नुकत्याच समोर आलेल्या स्पाय इमेजमध्ये बजाज मोटारसायकलचे रेडिएटर दिसले नाहीत, जे लिक्विड कूल्ड बाइक्समध्ये उपलब्ध आहे. अशा स्थितीत हे इंजिन ऑईल कूलिंगसह बाजारात दाखल होऊ शकते.

5. एलईडी डीआरएल एस

बजाजच्या या आगामी बाईकमध्ये एलईडी डीआरएल देखील आहे, जे हेडलॅम्पच्या समोर आहे. आजच्या काळात हे फीचर्स अनेक बाइक्समध्ये दिसू शकतात, त्यामुळे बजाजच्या या बाईक्समध्ये हे फिचर असणे ही फार नवीन गोष्ट नसेल.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(2021 Bajaj Pulsar 250 to launch in India on October 28, 5 new feature you should know)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.