AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 Bajaj Pulsar 250 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बजाज ऑटोने गुरुवारी नवीन पल्सर 250 (2021 Bajaj Pulsar 250) स्ट्रीट बाईक भारतीय बाजारपेठेत 1.38 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच करण्यात आली आहे. F250 ची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

2021 Bajaj Pulsar 250 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2021 Bajaj Pulsar 250
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 28, 2021 | 5:18 PM
Share

मुंबई : बजाज ऑटोने गुरुवारी नवीन पल्सर 250 (2021 Bajaj Pulsar 250) स्ट्रीट बाईक भारतीय बाजारपेठेत 1.38 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच करण्यात आली आहे. F250 ची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीच्या पल्सर रेंजमधील बाइक्समध्ये हे एक विशेष उत्पादन आहे. नवीन पल्सर 250 ही बाइक्सच्या सध्याच्या पल्सर फॅमिली प्रमाणेच डिझाइनच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये फुल एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी इंडिकेटर आणि बायफरकेटेड टेललाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट सीट सेटअप आणि मोनोशॉक सारख्या बिट्सचा समावेश आहे. (2021 Bajaj Pulsar F250, Pulsar N250 launched in India, know details)

रियर सस्पेन्शनमुळे नवीन मोटरसायकल अधिक आकर्षक बनली आहे. मोटारसायकल सिग्नेचर पल्सर स्टाइलसह सादर करण्यात आली आहे, सोबत यात विविध अॅडव्हान्स एलिमेंट्स मिळतील. नवीन बजाज पल्सर 250 दोन व्हेरिएंट्समध्ये येते. यात पल्सर एन 250 आणि पल्सर एफ 250 चा समावेश आहे. Pulsar N250 एक स्टँडर्ड मॉडेल म्हणून सादर करण्यात आलं आहे आणि Pulsar F250 क्वार्टर-लीटर मोटरसायकलचं सेमी-फेयर्ड व्हर्जन आहे.

नवीन पल्सर 250 बाइक्सच्या लोकप्रिय पल्सर फॅमिलीमधील एक विशेष मॉडेल म्हणून येते. बजाज ऑटोने भारतात किंवा जगात कुठेही लॉन्च केलेली ही सर्वात शक्तिशाली पल्सर आहे.

नवीन पल्सर 250 चं इंजिन

यामध्ये असलेले लिक्विड-कूल्ड इंजिन 24.5 PS पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. 5 स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन ड्यूटी सह येतं. चांगल्या सुरक्षिततेसाठी, यात 300 मिमी डिस्क ब्रेक, 230 मिमी रिअर डिस्क, सिंगल-चॅनेल एबीएससह मिळतात. मोटरसायकल 100 मिमी फ्रंट, 130 मिमी रियर क्रॉस-सेक्शन टायरवर चालते.

नवीन पल्सर बाईकमध्ये काय आहे खास?

नवीन बजाज पल्सर 250 मध्ये रियर सिंगल मोनोशॉक यूनिटसह टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतील. सध्याच्या पल्सर 220F मॉडेलच्या तुलनेत हे एक मोठे अपडेट आहे, जे मागील बाजूस ट्विन शॉक युनिटसह येते. नवीन Pulsar 250 व्यतिरिक्त, पुणेस्थित ऑटोमेकरने Pulsar 250F च्या रूपात बाईकचं एक नवीन सेमी-फेअर व्हेरियंट देखील सादर केलं आहे. एक्सटीरियर डिझाइनमधील बदल दोन्ही नवीन पल्सर 250 ट्विन्स अंडरपिनिंगवर बेस्ड आहेत.

बजाज ऑटो लाइनअपमधील नवीन बजाज पल्सर 250 सध्याच्या Dominar 250 मोटरसायकलपेक्षा स्वस्त असेल. हे ग्राहकांच्या वेगवेगळ्या गटांना लक्ष्य करेल. नवीन Pulsar 250 च्या काही उल्लेखनीय स्पर्धकांमध्ये Yamaha FZ-25, Suzuki Gixxer आणि प्रसिद्ध KTM 200 Duke यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

PHOTO | वॅगन-आर ते किगर पर्यंत ‘या’ आहेत 5 सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार; या दिवाळीत करू शकता खरेदी

Nissan Magnite च्या ग्राहकांना धक्का, कंपनीकडून ग्लोबल प्रोडक्शनमध्ये 30 टक्के कपात, जाणून घ्या कारण

Toyota Innova Crysta चं लिमिटेड एडिशन बाजारात, जाणून घ्या नवे फीचर्स

(2021 Bajaj Pulsar F250, Pulsar N250 launched in India, know details)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?