
स्कोडा ऑटो इंडियाने आपली नवीन कार सादर केली आहे. या कारचे नाव 2022 Skoda Kodiaq SUV असे आहे. जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कंपनीने आपली नवीन SUV कार भारतात सादर केली आहे. नवीन स्कोडा कोडियाक (Kodiaq) गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सादर करण्यात आली होती, मात्र आता ही कार भारतात दाखल झाली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 34.99 लाख रुपये इतकी आहे.

2022 Skoda Kodiaq स्टाईल, स्पोर्ट लाइन, लाऊरीन अँड क्लेमेंट या तीन ट्रिम व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. या तीन व्हेरियंटची किंमत जाणून घेऊया. Kodiaq Style ची किंमत 34.99 लाख रुपये आहे, तर कोडियाक स्पोर्टलाइनची (Kodiaq Sportline) किंमत 35.99 लाख रुपये आहे. त्याच वेळी, कोडियाक लॉरिन आणि क्लेमेंटची (Kodiaq Laurin & Klement) किंमत 37.99 लाख रुपये इतकी आहे.

2022 Skoda Kodiaq SUV मध्ये केलेल्या बदलांबद्दल बोलायचे तर त्यात काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये समोरच्या बाजूला मोठ्या लोखंडी जाळीचा (ग्रिल) वापर करण्यात आला आहे. तसेच नवीन स्टाइलमध्ये बंपर देण्यात आला आहे. तसेच, कंपनीने एलईडी दिवे वापरले आहेत.

या एसयूव्ही कारमध्ये सनरूफही आहे. त्यात थ्री झोन क्लायमेट कंट्रोलचे फीचर्स देण्यात आले आहेत. यात 12 स्पीकर्स आहेत. 2022 स्कोडा कोडियाक (2022 Skoda Kodiaq) पेट्रोल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

2022 Skoda Kodiaq मध्ये 2.0 लीटर TSI डायरेक्ट इंजिन सिस्टम देण्यात आली आहे. हे इंजिन 187 Bhp पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. यात 7 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार Volkswagen Tiguan, Hyundai Tucson आणि Jeep Compass या गाड्यांशी स्पर्धा करेल.