9 एअरबॅग्ससह 2025 Skoda Kodiaq लॉन्च; Toyota Fortuner-MG Glosterचं टेन्शन वाढलं

स्कोडा ऑटो इंडियाने 2025 Skoda Kodiaq ची सेकंड जनरेशन भारतात लाँच केली आहे. यात 7 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि Sportline आणि L&K असे दोन वेरिएंट आहेत. त्यात 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, 9 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि 12.9 इंच टचस्क्रीन सारखी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत.

9 एअरबॅग्ससह 2025 Skoda Kodiaq लॉन्च; Toyota Fortuner-MG Glosterचं टेन्शन वाढलं
Skoda kodiaq 2025
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 12:46 PM

स्कोडा ऑटो इंडियाने आपली सेकंड जनरेशन 2025 Skoda Kodiaq ला भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. सात रंगांचा पर्यायात लॉन्च झालेल्या या नव्या फूल साइज एसयूव्हीला कंपनीने Sportline आणि L&K या दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात आणलं आहे. या एसयूव्हीची किमत किती आहे? यात कोणतं इंजिन दिलंय? आणि यात कोणते कोणते लेटेस्ट आणि आधुनिक फिचर्स दिलेत याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

डिझाईन आणि डिटेल्स

स्कोडा कोडिएक 2025 मध्ये कंपनीने 2.0 लीटर फॉर सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. ते 7 स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत येतं. हे दमदार इंजिन 201bhp ची पॉवर आणि 320Nmचे टॉर्क जेनरेट करते. डिझाइनबाबत सांगायचं तर या एसयूव्हीमध्ये नवीन बंपर, एलईडी हेडलँप्स, 18 इंज अलॉय व्हील, सी शेप एलईडी टेल लाइट्स आणि रुफ रेल सारखे बदल पाहायला मिळणार आहेत.

सेफ्टी फिचर्स

स्कोडाने या कारला डिझाइन करताना ग्राहकांच्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतलीय. या फूल साइज एसयूव्हीमध्ये 9 एअरबॅग्स दिल्या आहेत. या एसयूव्हीमध्ये 9 एअरबॅग्स शिवाय 360 डिग्री व्यूह कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी ब्रेकिंग सिस्टिम, EBD, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर्स यात सामिल आहेत.

स्कोडा कोडिएक फिचर्स

या कारमध्ये 12.9 इंच टचस्क्रीन इंफोटेमेंट सिस्टिम, 10 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, थ्री झोन क्लायमेंट कंट्रोल सिस्टिम, पॅनोरमिक सनरूफ, फ्रंट सीट्समध्ये हिटिंग आणि व्हेंटिलेशन सिस्टिम, मसाज फंक्शन, स्लायडिंग अँड रिक्लायनिंग सेकंड रो सीट, सब वुफरसह प्रीमियम 13 स्पीकर ऑडिओ सिस्टिम सारखे लेटेस्ट फिचर्सही यात आहेत.

2025 Skoda Kodiaqची किमत किती?

या गाडीचे स्पोर्टलाइन व्हेरिएंटची किमत 46 लाख 89 हजार रुपये (एक्स शोरूम) ठरवण्यात आली आहे. जर तुम्ही या गाडीचा L&K व्हेरिएंट खरेदी केला तर तुम्हाला 48 लाख 69 हजार रुपये (एक्स शोरूम) पडतील. स्कोडाची ही नवीन फूल साईज एसयूव्हीची मार्केटमधील एन्ट्रीने Toyota Fortuner आणि MG Gloster सारख्या गाड्यांना जोरदार टक्कर मिळणार आहे.