AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार लुक, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, Tata च्या ‘या’ कारला भारतीय ग्राहकांची पसंती

टाटा मोटर्सने आपली प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजच्या 7550 युनिट्सची विक्री केली आहे. (Tata altroz preferred by Indian consumers)

शानदार लुक, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, Tata च्या 'या' कारला भारतीय ग्राहकांची पसंती
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 11, 2021 | 4:10 PM
Share

मुंबई : टाटा मोटर्सने आपली प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजच्या (Tata Altroz) 7550 युनिट्सची विक्री केली आहे. हा सेल कंपनीने मार्च 2021 मध्ये साध्य केला आहे. गेल्या वर्षातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास मार्च 2020 मध्ये कंपनीने अल्ट्रोजच्या 1147 युनिट्सची विक्री केली होती. याचाच अर्थ कंपनीने यंदा अल्ट्रोजच्या विक्रीत तब्बल 558 टक्के वाढ साध्य केली आहे. ही वाढ इतर कोणत्याही टॉप 25 कारपेक्षा अधिक आहे आणि तीही मार्च महिन्यात. मासिक विक्रीचा विचार केला तर टाटाने एकूण 11 टक्के वाढ साध्य केली आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात 6,832 युनिट्सची विक्री नोंदवली होती. (5 star safety rating with premium look, Tata altroz car preferred by Indian consumers)

अल्ट्रोज ही एक दमदार कार आहे. या कारमध्ये, आपल्याला प्रीमियम क्वालिटीचे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. गाडीची केबिन स्पेस बऱ्यापैकी मोठी आहे. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेले प्रवासी सहज आपले पाय पसरवून बसू शकतात. ही एक आधुनिक कार आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारला सुरक्षेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

टाटाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात ही लाँच केली होती. काही आठवड्यांतच ही कार लोकांच्या पसंतीस उतरली. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या कारची विक्री मंदावली होती. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत या कारने विक्रमी आकडेवारी नोंदवली असून भारतीय ग्राहकांमध्ये अल्पावधित लोकप्रियता मिळवली आहे. प्रीमियम लुकबरोबरच तुम्हाला या कारमध्ये एक मजबूत इंजिन देखील मिळेल.

Tata Altroz चे फीचर्स आणि इंजिन

कंपनी ही कार 7 व्हेरिएंट आणि तीन इंजिन ऑप्शन्समध्ये देत आहे. यात पहिले 1.2 लीटरचे नॅचरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन आहे जे 86ps पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 110ps पॉवर आणि 140Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय तुम्हाला तिसरे 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल जे 90ps पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करेल. या व्यतिरिक्त तुम्हाला या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

या कारची किंमत 5.69 लाख ते 9.45 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एम्बियंट लायटिंग, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 4 एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रियर पार्किंग सेन्सर आणि स्पीड अ‍ॅलर्ट सिस्टम असे फीचर्स मिळतील.

इतर बातम्या

बंपर ऑफर! Maruti Suzuki Swift वर कंपनीकडून 54000 रुपयांचा डिस्काऊंट

बंपर ऑफर! Maruti Suzuki Swift वर कंपनीकडून 54000 रुपयांचा डिस्काऊंट

(5 star safety rating with premium look, Tata altroz car preferred by Indian consumers)

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ