AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

७ एअरबॅग, जबरदस्त मायलेज, ८ आसने, Toyota ची नवीन Innova Crysta लाँच

भारतीय बाजारातील काही कारची लोकप्रियचा कालानुरुप वाढतच आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टा त्याच काही निवडक कारमध्ये समाविष्ठ आहे. फॅमिली कार ते कमर्शियल सेगमेंटपर्यंत ही कार अनेकांची आवडती कार आहे. Innova Crysta 2026 अपडेटेड डिझाईन, फिचर्स आणि प्रीमियम इंटेरिअरसह लाँच केले आहे.

७ एअरबॅग, जबरदस्त मायलेज, ८ आसने, Toyota ची नवीन Innova Crysta लाँच
Innova Crysta 2026
| Updated on: Jun 04, 2026 | 3:49 PM
Share

टोयोटाने भारतीय बाजारात तिची दमदार कार इनोव्हा क्रिस्टाचे (Innova Crysta 2026) अपडेट मॉडेल आणले आहे. बधुवारी टोयोटा ब्रँडने या पॉप्युलर एमपीव्हीचे लेटेस्ट अपडेट मॉडेल लाँच केले आहे. अवडेटेड व्हर्जनमध्ये कारचे इंटेरिअर आणि एक्सटिरिअर दोन्हीत बदल केला आहे. मात्र, कारच्या इंजिनात कोणताही बदल केलेला नाही.

इनोव्हा क्रिस्टामध्ये लाँचिंग पासूनच मिळत असलेले २.४ लिटरचे डिझेल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन आताही याच्या सोबत आहेत. शक्यतो हे कारचे अखेरचे अपडेट असणार आहे. इनोव्हा क्रिस्टाला कंपनी साल २०२७ मध्ये बंद करु शकते असे म्हटले जात आहे. मात्र, इनोव्हा हायक्रॉसवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

कारमध्ये नवीन काय ?

अपडेटेड टोयोटा इनोव्हा क्रिस्टात रिडिझाईन रेडिएटर ग्रिल मिळू शकते. यात फ्रंट आणि रिअर बंपरला देखील रिडिझाईन केले गेले आहे. ज्यामुळे कारचा लुक आधीहून जास्त बोल्ड झाला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या बदल कारला रिफ्रेश लुक देण्यासाठी केला आहे. सोबतच कारची लोकांमध्ये असलेली जुनी ओळखही कायम ठेवली आहे. इंटेरिअरचे बोलायचे झाले तर केबिनमध्ये ड्यु्अल टोन लेदर सीट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. याशिवाय इंस्ट्रमेंट पॅनल, डोअर ट्रिम्सवर वूड पॅटर्नला हायलाईट मिळणार आहे. कारमध्ये वायरलेस चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देण्यात आली आहे. मात्र, हा बदल सर्व ट्रिममध्ये मिळणार नाही.

किती आहे किंमत?

नव्या इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta 2026) कारची किंमत १९ लाख ७२ हजार रुपये एक्स शोरुमपासून सुरु होते. ही किंमत कारच्या जीएक्स ७ व्हेरिएंटचे आहे. कारची टॉप व्हेरिएंट २६ लाख ६३ हजार रुपयांत येते. इनोव्हा क्रिस्टा ७ सीटर आणि ८ सीटर कॉन्फिग्रेशनवर येते. ही कार पाच कलरच्या पर्यायात मिळते. यात प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सुपर व्हाईट, सिल्व्हर मॅटेलिक, एटीट्युड ब्लॅक मायका आणि एव्हेंट-गार्डे ब्राँझ मॅटेलिक असे हे कलर आहेत.

कारमध्ये आधीचेच २.४ लिटरचे डिझेल इंजिन मिळत असून जे मॅन्युअर ट्रान्समिशन सोबत येते. कंपनीने दिलेल्या माहिती नुसार ही कार १५ किलोमीटर प्रति लिटरचा मायलेज ऑफर करते. कारमध्ये ७ एअरबॅग, एबीएस, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हील स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग फोर्स डिस्ट्रीब्युशनचे सेफ्टी पॅकजे मिळते.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...