Maruti चा मोठा झटका, Alto-Wagon R किंमती वाढणार, किती पाहा….
Maruti Price Hike: मारुती सुझुकीने चालू आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत आधीच तीन वेळा दरवाढ केली आहे. लागोपठच्या या तीन दरवाढींने एकत्रितपणे कारच्या किंमतीत १% पेक्षा थोडी जास्त वाढ झाली आहे.

Maruti Suzuki Price Hike : देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ( Maruti Suzuki ) ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने रविवारी २२ नोव्हेंबर २०२६ रोजी निवडक कार मॉडेलच्या किंमतीत वाढ केली आहे. जर तुम्ही मारुतीची नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असास तर तुम्हाला याच्या तुलनेत थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. कंपनीचे म्हणणे सतत वाढणारा खर्चामुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मारुतीने या दरवाढीचा फटका ग्राहकांवर जास्त बसू नये याची काळजी घेतली आहे.
किती महागल्या कार
Maruti Suzuki ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने वाढत्या इनपुट कॉस्टला पाहाता. निवडणक मॉडेलवर किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन किंमती २२ नोव्हेंबर २०२६ म्हणजे रविवार पासूनच लागू होणार आहेत. कंपनीने किंमतीत सरासरी ०.३१ टक्के वाढ केली आहे. हा वॉल्युम-वेटेड एव्हरेज किंमत वाढ केली आहे. म्हणजे वेगवेगळ्या मॉडेलची विक्रीच्या हिशेबाने किंमतीत सरासरी वाढ केली आहे.
खर्च कमी करण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे वाढीव खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, या दरवाढीचा ग्राहकांवरील परिणाम कमीत कमी करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. सध्या, कंपनीने सर्व मॉडेल्सच्या नवीन किमतींचा तपशील जाहीर केलेला नाही असे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे .
6 महिन्यात चौथ्यांदा किंमत वाढ
चालू आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत आधीच तीन वेळा दरवाढ केली असतानाही मारुती सुझुकीने ही दरवाढ केली आहे, जेव्हा. या तिन्ही दरवाढी मिळून, कारच्या किमतींमधील एकूण वाढ १ टक्क्यांहून अधिक आहे. आता, नोव्हेंबरमधील नवीन दरवाढीमुळे ग्राहकांना निवडक कारसाठी आणखी जास्त पैसे मोजावे लागतील.
विशेष म्हणजे, मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत मोठी वाढ होऊनही, कंपनीच्या नफ्यावर दबाव कायम आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत २६.३६ टक्क्यांनी घसरून ₹२,४६६.१ कोटींवर गेला आहे. याच कालावधीत कंपनीने विक्रमी तिमाही विक्री आणि महसुलात मोठी वाढ नोंदवली आहे.
कंपनीच्या उत्पन्नावर कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम झाला आहे. पश्चिम आशियाती सुरु असलेला संघर्षाने इनपुढे कॉस्ट वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर होणार आहे. कंपनीच्या कमाईवर कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम झाला आहे.
पश्चिम आशियाच जारी संघर्ष पाहाता इनपुट कॉस्ट वाढली आहे. ज्याचा परिणा कंपनीच्या नफ्यावर दिसत आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेंटिग EBITDA मार्जिन देखील घटकर ९.४ टक्के राहिला आहे. गेल्यावर्षी याच काळात १२.७ टक्के होता.
किंमती वाढल्यानंतरही सांभाळले मार्जिन
दुसरी तिमाही दरम्यान मारुतीला जास्त विक्री आणि चांगल्या किंमतीचा जरुर फायदा होईल. परंतू वाढता खर्चाने या नफ्याचा मोठा भाग कमी केला आहे. कंपनीने खर्चांवरील नियंत्रण करण्यासाठी मार्केटिंग खर्चात देखील कपात केली. याच्यानंतरही खर्चाचा दबाव कमी झालेला नाही. दुसऱ्या तिमाहीच्या परिणामानंतर कंपनीने संकेत दिला होता. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत गरजेच्या हिशेबाने किंमतीत बदल केला जाऊ शकतो. आता कंपनीने या दिशेत पाऊल उचलत निवडक मॉडेलना महाग केले.