लाँच होणार भन्नाट इलेक्ट्रीक कार,अवघ्या तीन मिनिटांत बॅटरी चार्ज, इतकी असणार रेंज

Blinq Mobility EV: या इलेक्ट्रीक कारमध्ये अनेक मॉडर्न फिचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांना त्यामुळे तंत्रज्ञान आणि सुविधा दोन्हींचा उत्तम अनुभव मिळणार आहे. चला तर या कारची वैशिष्ट्ये माहिती करुन घेऊयात...

लाँच होणार भन्नाट इलेक्ट्रीक कार,अवघ्या तीन मिनिटांत बॅटरी चार्ज, इतकी असणार रेंज
Blinq Mobility
| Updated on: Jun 09, 2026 | 7:10 PM

भारतात इलेक्ट्रीक कारची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. परंतू आजही अनेक लोकांना इलेक्ट्रीक कार विकत घेताना थोडा विचार करावा लागतो. अनेक लोकांना कारच्या चार्जिंग आणि रेंजची चिंता असते. अनेकदा लांबच्या प्रवासात चार्जिंग स्टेशन शोधणे कठीण असते. तसेच बॅटरी चार्ज करायला देखील प्रचंड वेळ लागतो. आता अशी इलेक्ट्रीक कार आली आहे ज्यात बॅटरी चार्ज होण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. गरज पडताच काही मिनिटांत बॅटरी बदलून पुढचा प्रवास करणे सोपे जाते.

Blinq Mobility नावाच्या कंपनीने बॅटरी स्वॅपिंग तंत्रावर आधारित एक नवीन इलेक्ट्रीक कार बाजारात आणली आहे. या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी खासियत ही असते की या कारची बॅटरी कायम स्वरुपी फिट केलेली नसते. गरज लागेल तेव्हा ही बॅटरी काढून दुसरी चार्ज केलेली बॅटरी लावता येते. ज्या प्रकारे पेट्रोल पंपावर काही मिनिटांत इंधन भरुन आपण पुढे जात असतो. त्याच प्रकारे भविष्यात बॅटरी स्वॅपिंग स्टेशनला जाऊन काही मिनिटात नवीन बॅटरी लावून प्रवास जारी ठेवता येणे शक्य होणार आहे. ही बॅटरी केवळ तीन मिनिटात चार्ज होईल आणि 250 KM ची रेंज देईल.

कोणासाठी फायद्याची ही कार?

हे तंत्रज्ञान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना रोजचा लांबपल्ल्याचा प्रवास करायचा असतो वा ज्यांच्या घराच्या जवळ चार्जिंगची सुविधा नाही. सर्वसाधारण इलेक्ट्रीक कारच्या बॅटरीला चार्ज होण्यासाठी अनेक तास लागू शकतात. मात्र, बॅटरी स्वॅपिंग सिस्टीममध्ये हे वाट पाहणे टळणार आहे. यामुळे इलेक्ट्रीक कार चालवणे आणखी सोपे आणि सुविधाजनक होणार आहे.

कारच्या डिझाईन बाबत बोलायचे झाले तर शहरातील वापर पाहून या कारची रचना केली आहे. याचा आकार कॉम्पॅक्ट ठेवला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आणि अरुंद गल्लीबोळात ही कार पार्क करणे शक्य होणार आहे. ही कार अशा लोकांसाठी आहे जे रोज घर ते ऑफीस प्रवास करतात आणि ज्यांना पर्यावरण अनुकूल कार हवी आहे.

रनिंग कॉस्ट कमी होणार

या इलेक्ट्रीक कारमध्ये मॉडर्न फिचर्स देखील देण्यात आले आहे. ग्राहकांना तंत्रज्ञान आणि सुविधा दोन्हींचा अनुभव त्यामुळे मिळणार आहे.तसेच त्याची रनिंग कॉस्ट पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत खूप कमी असण्याची आशा आहे. कंपनीने दावा केला आहे बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान आपलेले केल्याने कार खरेदी आणि चालवण्याचा एकूण खर्चात देखील बचत होऊ शकते.

 

Follow Us