ऑडी इंडियाकडून Audi Q7 साठी बुकिंग्ज घेण्यास सुरुवात, प्रीमिअम प्लस, टेक्‍नोलॉजी व्‍हेरिएंट्समध्ये SUV बाजारात

| Updated on: Jan 11, 2022 | 6:04 PM

ऑडी (Audi India) या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये त्यांची नेक्स्ट-जनरेशन ऑडी क्यू7 च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची (bookings Open) घोषणा केली.

ऑडी इंडियाकडून Audi Q7 साठी बुकिंग्ज घेण्यास सुरुवात, प्रीमिअम प्लस, टेक्‍नोलॉजी व्‍हेरिएंट्समध्ये SUV बाजारात
All-new Audi Q7 SUV
Follow us on

मुंबई : ऑडी (Audi India) या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये त्यांची नेक्स्ट-जनरेशन ऑडी क्यू7 च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची (bookings Open) घोषणा केली. नवीन ऑडी क्यू7 (Audi Q7) मध्ये कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. नवीन शक्तिशाली 3.0 लीटर व्ही6 टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे 340 एचपी पॉवर जनरेट करते, तसे 5000 एनएम टॉर्क निर्माण करते. तसेच केवळ 5.9 सेकंदांमध्ये प्रतितास ही कार 0 ते 100 किमी गती प्राप्त करते. ऑडी क्यू7 ही कार 5 लाख रुपये भरुन बूक करता येईल. (All-new Audi Q7 SUV bookings open in India, know price and feaures)

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लों म्हणाले, “2021 मध्ये आम्ही नऊ उत्पादने लॉंच केल्यानंतर आम्ही आणखी एक अविश्वसनीय ऑफरिंग दिग्गज ऑडी क्यू7 सह नववर्षात प्रवेश करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आजपासून या कारच्या बुकिंग्जचा शुभारंभ करत आहोत. ऑडी क्यू7 रस्त्यावरील दिमाखदार उपस्थिती आणि ऑन-रोड व ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्यक्षमतेमुळे ग्राहकांमध्ये लोकप्रि‍य ठरली आहे. ऑडी क्यू7 च्या माध्यमातून आम्ही नवीन डिझाइन व वैशिष्ट्यांसह या स्तराला अधिक उंचावर नेत आहोत. मला विश्वास आहे की, ऑडी क्यू7 ऑडी समूहामध्ये सामील होण्याची इच्‍छा असलेल्या विद्यमान व भावी ग्राहकांमध्ये लोकप्रि‍य राहिल.”

ऑडी क्यू7 मध्ये सर्वोत्तम फीचर्स आहेत, जसे की अॅडप्टिव्‍ह एअर सस्पेंशन, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, जे उच्च दर्जाची ड्रायव्हिंग क्षमता व हाताळणीमध्ये साह्य करते. ड्रायव्हरला साह्य करणारी वैशिष्ट्ये आहेत- पार्क असिस्ट प्लससह 360-डिग्री-व्ह्यू कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग. मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स व रिअर एलईडी टेल लॅम्प्सच्या माध्यमातून अपवादात्मक लायटिंग परफॉर्मन्सची खात्री मिळते. तसेच पुढील व मागील बाजूस डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स आहेत. आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये 4-झोन एअर कंडिशनिंग, एअर आयनोझर व अरोमाटायझेशन, कॉन्टर अॅम्बियण्ट लायटिंगसह 30 रंग, बीअॅण्डओ प्रीमिअम 3डी साऊंड सिस्टिम यांचा समावेश असण्यासह इतर सर्वोत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत.

नवीन ऑडी क्यू7 प्रि‍मिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. ग्राहक त्यांच्या घरांमधून आरामशीरपणे ऑनलाइन ऑडी क्यू7 बुक करू शकतात किंवा जवळच्या ऑडी इंडिया डिलरशिपमध्ये त्यांची त्यांच्या इंटरेस्ट नोंदवू शकतात.

ऑडी इंडियाने 2021 साठी विक्रीमध्ये 101 टक्‍के वाढीची घोषणा केली. ब्रॅण्‍डने 3293 रिटेल युनिट्सच्या उत्तम विक्रीची नोंद केली. या वाढीला ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन 55, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक 55, ऑडी ई-ट्रॉन जीटी, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या पाच इलेक्ट्रिक कार्स आणि पेट्रोल सक्षम क्यू–रेंजसह ए-सेदान्सकडून चालना मिळाली. 2021 मध्ये ई-ट्रॉन ब्रॅण्डअंतर्गत पाच मॉडेल्‍ससह नऊ नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आले.

इतर बातम्या

Honda ची मोठी स्पेस असलेली कार, गाडीतली सीट घरातल्या बेडसारखी सरळ करता येणार

नवीन वर्षात Kia च्या ग्राहकांना झटका, कारच्या किंमतीत 54,000 रुपयांची वाढ

शानदार ऑफर! Renault Kwid अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(All-new Audi Q7 SUV bookings open in India, know price and feaures)