Auto News : इंजिनमधील CC, BHP, NM आणि RPM नेमकं काय असतं? जाणून घ्या!

| Updated on: Apr 29, 2023 | 8:39 PM

तुम्हाला इंजिनबद्दल माहिती असेल किंवा त्याबद्दल काहीतरी वाचलेही असेल. त्यामध्ये CC, BHP, NM आणि RPM असे अनेक शब्द तुमच्या वाचनात किंवा तुमच्या कानी आले असतील. पण तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहिती आहे का?

Auto News : इंजिनमधील CC, BHP, NM आणि RPM नेमकं काय असतं? जाणून घ्या!
Follow us on

मुंबई : इंजिन हा प्रत्येक वाहनाचा महत्त्वाचा भाग असतो. मग ती कार असो, बाईक असो, बस असो किंवा ट्रक असो इंजिन हा वाहनांचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतोच. तसेच तुम्हाला इंजिनबद्दल माहिती असेल किंवा त्याबद्दल काहीतरी वाचलेही असेल. त्यामध्ये CC, BHP, NM आणि RPM असे अनेक शब्द तुमच्या वाचनात किंवा तुमच्या कानी आले असतील. पण तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहिती आहे का? तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

CC म्हणजे काय?

CC म्हणजे Cubic Capacity. CC हे इंजिनमधील सर्व सिलेंडर्सची एकूण मात्रा आहे, जी क्यूबिक सेंटीमीटरमध्ये मोजली जाते. इंजिनच्या आकाराचे वर्णन करण्यासाठी सीसीचा वापर केला जातो.  जसे की, 1000 cc इंजिन किंवा 1500 cc इंजिन.

BHP म्हणजे काय?

BHP म्हणजे ब्रेक हॉर्सपावर. हे इंजिनच्या पॉवर आउटपुटचे एक मोजमाप आहे. BHP वाहन चालवत राहण्यासाठी इंजिन किती शक्ती प्रसारित करते याचे वर्णन करते. BHP ला hp आणि ps मध्ये समाविष्ट केले जाते.

NM म्हणजे काय?

NM म्हणजे न्यूटन मीटर. हे इंजिनच्या टॉर्क आउटपुटबाबत सांगते. न्यूटन मीटर हे इंजिनच्या टॉर्कचे प्रमाण दर्शविण्यासाठी वापरले जाते. टॉर्क हे इंजिनचे रोटेशनल फोर्स असून ते एक्सीलिरेशन खूप महत्त्वाचे आहे. टॉर्क जेवढं जास्त असेल तेवढेच एक्सीलिरेशन वेगवान असेल आणि जड भार उचलण्याची क्षमता जास्त असेल.

RPM म्हणजे काय?

RPM म्हणजे ‘रोटेशन प्रति मिनिट’. इंजिनचा क्रँकशाफ्ट एका मिनिटात किती वेळा फिरतो ते RPM युनिटने मोजले जाते. जसे की, Brezza चे इंजिन 6000RPM वर 100.6PS पॉवर जनरेट करते. म्हणजेच एवढी शक्ती निर्माण करण्यासाठी इंजिनचा क्रँकशाफ्ट एका मिनिटात 6000 वेळा फिरतो.