Auto News : किंमत रास्त आणि मायलेज जास्त, या पाच बाइकबाबत जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Mar 07, 2023 | 4:24 PM

पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहत्या परवडणाऱ्या बाइकसह मायलेज असणाऱ्या गाड्यांना पसंती दिली जाते. तुम्ही अशाच बाइकच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला पाच पर्याय सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला योग्य गाडी निवडणं सोपं होईल.

1 / 5
Bajaj Platina : मायलेज बाइकची यादी म्हंटलं की बजाज प्लेटिनाचं नाव आघाडीवर येतं. या बाइकची किंमत 67 हजारांच्या घरात असून यात 115.45 सीसीचं बीएस6 इंजिन मिळतं. हे इंजिन 8.44 बीएचपी पॉवर आणि 9.81 एनएम टॉर्क जनरेट करु शकते. या गाडीचा मायलेज 70 ते 80 किमी प्रति लिटर आहे. (फोटो: Bajaj)

2 / 5
Hero HF Deluxe : सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाइकच्या यादीत हिरो एचएफ डिलक्सचा क्रमांकही लागतो. या बाइकमध्ये 97.2 सीसीचं इंजिन आहे. हे इंजिन 7.91 बीएचपी पॉवरवर 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. या गाडीची किंमत 61 हजार रुपये इतकी आहे. ही गाडी एका लिटरवर 65 ते 70 किमीचा मायलेज देते.  (फोटो: Hero)

3 / 5
Bajaj CT 125X : बजाजची सीटी 125 एक्स ही बाइकही मायलेजसाठी चांगली आहे. या बाइकमध्ये 124.4 सीसीचं इंजिन आहे. ही बाइक 59.4 किमीपर्यंत मायलेज तेते. या गाडीची किंमत 75 हजार रुपये आहे. (फोटो: Bajaj)

4 / 5
Honda CD110 : मायलेज देणाऱ्या बाइकच्या यादीत होंडा सीटी 110 या बाइकचं नावंही येतं. या बाइकमध्ये 109.51 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 5500 आरपीएमवर 9.30 एनएम टॉर्क जनरेट करते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 47,398 रुपयांपासून 75,179 रुपयांपर्यंत जाते. (फोटो: Honda)

5 / 5
TVS Star City Plus : या बाइकची किंमत 70 हजार रुपयांपासून सुरुवात होते. या बाइकमध्ये 109.7 सीसी इंजिन दिलं आहे. हे इंजिन 4500 आरपीएमवर 8.7 एनएम टॉर्क जनरेट करते. ही गाडी एका लिटरवर 70 ते 80 किमी मायलेज देते. (फोटो : TVS)