Royal Enfield सारखी मोटरसायकल हवी, हे आहेत बेस्ट 5 ऑप्शन, 2.5 लाखात होऊन जाईल काम

Royal Enfield Bullet 350 vs Rivals: क्लासिक सेगमेंटमध्ये आजही रॉयल एनफिल्ड बाइक्सला तोड़ नाहीय. पण तुम्ही रॉयल एनफिल्ड ऐवजी दुसरी कुठली बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्केटमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. त्याची माहिती या आर्टिकलमध्ये जाणून घ्या.

Royal Enfield सारखी मोटरसायकल हवी, हे आहेत बेस्ट 5 ऑप्शन, 2.5 लाखात होऊन जाईल काम
best option for royal enfield
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 6:24 PM

मुंबई : भारतासह आजही जगभरात क्लासिक बाइक्सला भरपूर पसंत केलं जातं. देशात आज या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डच राज्य कायम आहे. सध्या काही दुसऱ्या मोटरसायकल बनवणाऱ्या कंपन्या रॉयल एनफिल्डच्या दबदब्याला आव्हान देत आहेत. या बाइक्समध्येही तुम्हाला क्लासिक आणि रेट्रो डिजाइनचा संगम मिळतो. जर तुम्ही चेन्नई स्थित मोटरसायकल कंपनीचा पर्याय शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला 5 पावरफुल बाइक्सची माहिती देणार आहोत. यांची एक्स-शोरुम प्राइस 2.5 लाख रुपयापेक्षाही कमी आहे. जावा, येजदी आणि होंडा सारख्या कंपन्यांनी रॉयल एनफिल्ड बाइक्सला टक्कर देण्यासाठी अनेक बाईक्स बाजारात आणल्या आहेत. दमदार इंजिन आणि उत्तम फिचर्ससह या बाइक्स तुमच्यासाठी चांगल्या ऑप्शन ठरु शकतात. हार्ले-डेविडसनने यावर्षी हीरो मोटोकॉर्पसोबत मिळून खासकरुन भारतीयांसाठी स्वस्त बाइक लॉन्च केली.

Royal Enfield Rivals: रॉयल एनफिल्डचे 5 स्पर्धक

या पाच मोटरसायकल रॉयल एनफिल्डच्या Classic 350, Hunter 350, Bullet 350 सारख्या बाइक्सचा सामना करतात.

Honda CB350 : होंडाची रेट्रो-क्लासिक लुक असलेली सीबी350 रॉयल एनफिल्ड टॉप कॉम्पीटीटर्स पैकी एक आहे. याची डिजाइन आणि स्टाइल खूप शानदार आहे. या बाइकमध्ये 348.36cc पावरच इंजिन येतं. भारतात होंडा सीबी 350 ची एक्स-शोरूम प्राइस 1.99 लाख रुपयापासून सुरु होते.

Harley Davidson X440 : हार्ले-डेविडसनने भारतीय कस्टमर्ससाठी खूप स्वस्त बाइक X440 लॉन्च केलीय. 440cc इंजिनसह या लिस्टमधील ही सर्वात जास्त पावरफुल बाइक आहे. हार्ले ब्रांडसोबत येणाऱ्या स्टायलिश बाइकची एक्स-शोरूम किंमत 2.39 लाख रुपये आहे.

Jawa 42 : महिंद्रा एंड महिंद्रा अंतर्गत येणारी जावा मोटरसायकल सुद्धा रॉयल एनफिल्डला टक्कर देते. तुम्ही जावा 42 विकत घेऊ शकता. यामध्ये 294.72cc पावरच इंजिन येतं. इंडियन मार्केटमध्ये या बाइकची एक्स-शोरूम प्राइस 1.98 लाख रुपयापासून सुरु होते.

Yezdi Roadster : महिंद्राची येजदी रोडस्टर या सेगमेंटमध्ये एक जबरदस्त ऑप्शन बनू शकते. येजदी रोडस्टर 334cc पावर इंजिनसह येते. एकवेळ भारतीय रस्त्यावर सर्वाधिक दिसणारी येजदी मोटरसायकलची किंमत 2.08 लाख रुपयापासून सुरु होते.

Benelli Imperiale 400: बेनेली इम्पेरियल 400 क्लासिक मोटरसायकल पावरफुल बाइक आहे. डिजाइन आणि स्टाइलसह तुमच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. या मोटरसायकलमध्ये 374 cc च इंजिन मिळेल. याची सुरुवातीचा एक्स-शोरूम किंमत 2.35 लाख रुपये आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.