
टोयोटा कंपन्यांच्या गाड्या जर आपली पसंत आहे तर या महिन्यात बंपर बचतीची संधी आली आहे. टोयाटो कंपनीने Glanza, Hilux, Hyryder, Taisor आणि Innova सारख्या मॉडेल्सवर १ लाख १० हजारापर्यंतची मोठी सूट दिली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये टोयाटो मॉडेलवर कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज/स्क्रॅप बोनस, लॉयल्टी आणि अन्य बेनिफिट्स दिले जात आहेत. चला तर पाहूयात ऑगस्टमध्ये टोयोटा कोणत्या मॉडेल्सवर तुम्हाला किती रुपयाची सूट मिळणार आहे.?
Toyota Glanza: या गाडीचे बेस मॉडेल E MT वगळून ग्लेंझावर अतिरिक्त लॉयल्टी रिवॉर्ड्ससह एकूण १,०५,३०० रुपयांपर्यंतची सुटचा फायदा मिळत आहेत. ज्यात ४५ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट, ४० हजार रुपयांचा एक्स्चेंज/स्क्रॅप बोनस, १३,८०० रुपयांची पाच वर्षांची वॉरंटी आणि ६,५०० रुपयांचा कॉर्पोरेट/सरकारी/ग्रामीण लाभाचा समावेश आहे.
Toyota Hyryder:या गाडीवर २८ हजाराचा कॅश डिस्काऊंट, ४० हजार रुपयांचा एक्स्चेंज डिस्काऊंट,२३,६०० रुपयांचा एक्सटेंडेड वॉरंटी आणि ६,५०० रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट्स दिला जात आहे. E Neo Drive मॉडलच्या G आणि V व्हेरिएंट ६७ हजार रॉयल्टी, S व्हेरिएंटवर ६५,६०० हजाराची लॉयल्टी, एंट्री लेव्हल E Neo वेरिएंटवर ८० हजार ६०० रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
Toyota Innova: टोयोटा या प्रसिद्ध गाडीवर १५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि ४४ हजार रुपयांची किट दिला जात आहे. ज्यामुळे या कारवर एकूण ५९,४०० रुपयांचा बचतीची मोठी संधी मिळत आहे.
Toyota Taisor: या मिड साईज एसयुव्हीच्या १.० लिटर टर्बो व्हेरिएंटवर एकूण ५०,९०० रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस,१० रुपयांचा कॅश डिस्काऊंट, २० हजार रुपयांचा एक्स्चेंज/स्क्रॅप बोनस, ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट आणि १७ हजार ९०० रुपयांचा एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे.
Toyota Rumion: मारुती सुझुकी आर्टीगाला टक्कर देणारी या गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटवर २० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस दिला जात आहे. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर सध्या सुट मिळत नाहीए.
टाटा कंपनीच्या गाड्यांवर मोठी सूट
टाटा मोटर्स देखील ऑगस्ट महिन्यात टाटा टियागो, टाटा पंच, टाटा कर्व्ह, टाटा हॅरियर आणि टाटा सफारीवर १ लाख ०५ हजार रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काऊंट देत आहे.