शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी
Maruti Suzuki WagonR
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 3:44 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki WagonR LXI in just rs 150000, know more about it)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

2008 चं पेट्रोल मॉडल

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Wagon R LXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 2008 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 1,10,622 किलोमीटरपर्यंत धावली आहे.

4.65 लाखांची कार 1.45 लाखात

या मॉडेलचा रंग सिल्व्हर असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 4.65 लाख रुपयांपर्यंत असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 1.45 लाख रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Wagon R LXI www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.

टेस्ट ड्राईव्ह बुक करा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/wagon-r-in-new-delhi-2008/AXgW8KlqNiwKO4z0JslQ) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा. तसेच तुम्ही जर सेकेंड हँड कार खरेदी करत असाल तर सर्वात आधी गाडीचे कागदपत्र, डेटिंग पेटिंग पाहून घ्या, त्यानंतर गाडी चालवून पाहा. तसेच गाडी घेताना सोबत एखाद्या मेकॅनिकला न्या, त्याच्या सल्ल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया सुरु करा.)

इतर बातम्या

Hero MotoCorp च्या ग्राहकांसाठी खुशखबर! कंपनीने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

महिंद्राचा दिलदारपणा, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला

टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला देशात सर्वाधिक पसंती, विक्रीच्या बाबतीत अव्वल, सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज

(bumper offer buy Maruti Suzuki WagonR LXI in just rs 150000, know more about it)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.