AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hero MotoCorp च्या ग्राहकांसाठी खुशखबर! कंपनीने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) घोषणा केली की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची (मोटारसायकल आणि स्कूटर) वॉरंटी वाढवित आहेत.

Hero MotoCorp च्या ग्राहकांसाठी खुशखबर! कंपनीने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 18, 2021 | 5:24 PM
Share

मुंबई : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) घोषणा केली की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची (मोटारसायकल आणि स्कूटर) वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (CoronaVirus Second Wave) थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या वाहनांची वॉरंटी आणि नि:शुल्क सेवांचा कालावधी 60 दिवसांनी वाढवला आहे. (Hero MotoCorp extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

कंपनीने सोमवारी जाहीर केले की, आपल्या सर्व विद्यमान ग्राहकांच्या हितासाठी, सध्याच्या काळात वाया जाणाऱ्या सेवांच्या कालावधीत 60 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, या सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी घाईत डीलरकडे धाव घेऊ नये, यासाठी हा कालावधी वाढविण्यात आला आहे. दरम्यान, हिरो मोटोकॉर्पने सोमवारी हरियाणामधील गुरुग्राम आणि धारुहेरा तसेच उत्तराखंडमधील हरिद्वार येथील तीन प्लांटमध्ये अंशतः कामकाज सुरू केले आहे.

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Tata Motors चं ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट

टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर हेड डिंपल मेहता यांनी जाहीर केले की, कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणताही ग्राहक त्यांच्या कारच्या सर्व्हिस आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती ज्या ग्राहकांची सर्व्हिस आणि वॉरंटी अद्याप प्रलंबित आहे अशा ग्राहकांसमोर आव्हान उभे आहे.

Maruti ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

मारुती सुझुकीने बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले आहेत की, आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. आम्ही वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, मारुतीसह इतर अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

महिंद्रानेही वाहनांची वॉरंटी वाढवली

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या गाड्यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy

Hero MotoCorp 2022 मध्ये इलेक्ट्रिक बाईक/स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या कंपनीचं प्लॅनिंग

(Hero MotoCorp extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर