भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर Honda Activa अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर Honda Activa अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Honda Activa

पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 22, 2022 | 7:15 AM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक सेकेंड हँड स्कूटर घेऊन आलो आहोत. Honda Activa 3G STD असं या स्कूटरचं नाव आहे. ही स्कूटर खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. (buy Honda Activa 3G in 30000 rupees, know where you can get great deals)

Honda ची ही बाइक bikedekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची स्कूटर आहे. नवीन Honda Activa ची ऑन रोड किंमत जवळपास 65 हजार रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही स्कूटर 30,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Honda Activa 3G STD मध्ये 109 cc क्षमतेचं इंजिन आहे, जे 8.11ps पॉवर आणि 8.83 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या स्कूटरच्या पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये युजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही स्कूटर 1 लीटर पेट्रोलमध्ये 60 किमी मायलेज देते.

bikedekho वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2015 चे मॉडेल आहे. या स्कूटरने 9000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे आणि ती मुंबईतल्या आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या स्कूटरची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत. ग्राहक या लिंकवर (https://www.bikedekho.com/used-bike-details/used-honda-activa-3g-activa-3g-std-bikes-mumbai_5ea01693bc3de108ba1aa3ef.htm) जाऊन या स्कूटरबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही स्कूटर खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही bikedekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

(buy Honda Activa 3G in 30000 rupees, know where you can get great deals)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें