AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी
Maruti-alto-800 (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 21, 2022 | 9:11 AM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Discount Offer) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Maruti Suzuki Alto 800 LXI in just 230000 rupees in Mumbai)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.50 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी अल्टो एलएक्सआय (Maruti Suzuki Alto 800 LXI ) कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कंपनीने ही कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.

Maruti Alto 800 LXI चं हे 2013 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही सेकेंड ओनर कार असून महाराष्ट्रातल्या MH05-B या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 796 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 20,547 किमी धावली आहे. या कारवर थर्ड पार्टी इन्श्योरन्स उपलब्ध आहे.

हे वाहन सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 2,30,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही सेकेंड ओनर कार असून जून 2013 चे मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 20,547 किलोमीटर धावली आहे. या कारची नोंदणी MH05-B RTO आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, अथवा याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या लिंकवर (https://www.cars24.com/buy-used-Maruti-Alto-800-2013-cars-Mumbai-1032386203/) जाऊन माहिती घेऊ शकता.

ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि तुम्हाला दर महिन्याला 5,771 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. तसेच कंपनीने फ्री होम डिलीव्हरीचा पर्यायदेखील दिला आहे. या कारवर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(bring home Maruti Suzuki Alto 800 LXI in just 230000 rupees in Mumbai)

Follow Us
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप