शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी
Datsun Redi Go

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 19, 2022 | 9:00 AM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Discount Offer) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Datsun Redi Go in just 274000 rupees in Mumbai)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.20 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

आज आम्ही तुम्हाला डॅट्सन रेडी गो (Datsun Redi Go ) कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कंपनीने ही कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. कारचे मायलेज आणि मेंटेनन्स खूप चांगला आहे. यामध्ये तुम्हाला 999cc चे इंजिन मिळते. हे इंजिन 67.05 बीएचपी पॉवर जनरेट करते. यासह आपल्याला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनदेखील मिळतं.

मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 22 किमीचे मायलेज देते. हे वाहन सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 2,75,899 रुपये ठेवण्यात आली आहे. ही सेकेंड ओनर कार असून जुलै 2017 चे मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 23,607 किलोमीटर धावली आहे. या कारची नोंदणी MH-03 RTO ची (वडाळा, मुंबई) आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, अथवा याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या लिंकवर (https://www.cars24.com/buy-used-Datsun-Redi-Go-2017-cars-Mumbai-1039092700/) जाऊन माहिती घेऊ शकता.

ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि तुम्हाला दर महिन्याला 6,410 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. तसेच कंपनीने फ्री होम डिलीव्हरीचा पर्यायदेखील दिला आहे. या कारवर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

3 लाखांहून कमी किंमतीत 5 गाड्या, मारुती वॅगनआरसह चांगले पर्याय उपलब्ध

आता 8 सीटर गाड्यांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य, लवकरच नियम लागू होणार

प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक

(bring home Datsun Redi Go in just 274000 rupees in Mumbai)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें