1.60 लाखाची Royal Enfield Thunderbird 350 अवघ्या 53 हजारात खरेदीची संधी

| Updated on: May 30, 2021 | 8:02 PM

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

1.60 लाखाची Royal Enfield Thunderbird 350 अवघ्या 53 हजारात खरेदीची संधी
Royal Enfield Thunderbird 350 (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Pulsar 150Dts-i bike in just Rs 33000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

Thunderbird 350 अवघ्या 53 हजारात खरेदीची संधी

CredR वर तुम्हाला केवळ 52,990 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Royal Enfield Thunderbird 350 बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 350cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक सेकेंड ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 5000 रुपयांच्या किंमतीत 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Bangalore-Indira-Nagar/Royal-Enfield-Thunderbird-350/12282) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक बंगळुरुमध्ये उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 25,782 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव, 1 ऑक्टोबरपासून लागू होणारे नियम काय?