AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत.

Mahindra वाहनधारकांसाठी खुशखबर! कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांसाठी कंपनीचा मोठा निर्णय
mahindra extended warranty
| Updated on: May 22, 2021 | 11:11 PM
Share

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता 31 जूलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या गाड्यांचा समावेश आहे. (Mahindra extends free service and warranty of their vehicles due to Corona lockdown)

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Tata Motors चं ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट

टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर हेड डिंपल मेहता यांनी जाहीर केले की, कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणताही ग्राहक त्यांच्या कारच्या सर्व्हिस आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती ज्या ग्राहकांची सर्व्हिस आणि वॉरंटी अद्याप प्रलंबित आहे अशा ग्राहकांसमोर आव्हान उभे आहे.

Maruti ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

मारुती सुझुकीने बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले आहेत की, आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. आम्ही वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, मारुतीसह इतर अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

(Mahindra extends free service and warranty of their vehicles due to Corona lockdown)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.