Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार
Royal Enfield Himalayan

रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या कंपनीचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यांसमोर RE च्या शानदार बाईक्सचे फोटो येतात.

अक्षय चोरगे

|

May 09, 2021 | 10:43 PM

मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या कंपनीचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यांसमोर RE च्या शानदार बाईक्सचे फोटो येतात. आपल्याला ही बाईक घेऊन डोंगरदऱ्यांत भटकंती करावीशी वाटते. या यादीत जर एखादे मॉडेल अव्वल असल्यास ते रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) आहे. ही बाईक तिच्या कम्फर्टसाठी ओळखली जाते. म्हणजेच ही बाईक घेऊन तुम्ही डोंगरदऱ्यांत भटकंती सुरु केलीत तर तुम्हाला बिलकुल कंटाळा येणार नाही. परंतु काही शहरांमध्ये या बाईकचा वेटिंग पीरियड खूप जास्त आहे. (2021 Royal Enfield Himalayan waiting period deatails)

लॉकडाऊनमुळे बहुतेक रायडर्स सध्या घरीच आहेत, पण एक गोष्ट निश्चित आहे की, लॉकडाऊन उघडताच हे सर्व रायडर्स लेह लडाखच्या दौर्‍यावर रवाना होतील. अशा परिस्थितीत, मुंबई, चेन्नई, पुणे या शहरांमध्ये या बाईकसाठीचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) सर्वाधिक आहे. या शहरांमध्ये रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) साठी 4 महिन्यांच्या वेटिंग पीरियड आहे. तर दिल्ली आणि कोलकात्यामध्ये या बाईकसाठीचा प्रतीक्षा कालावधी 3 महिन्यांचा आहे.

नवीन Royal Enfield Himalayan मध्ये काय आहे खास?

2021 रॉयल एनफील्ड हिमालयन 3 नवीन कलर व्हेरिएंट ग्रॅनाइट ब्लॅक, मिराज सिल्व्हर आणि पाइन ग्रीन मध्ये सादर केली गेली आहे. यासह मोटारसायकल सध्याच्या कलर पॅलेटमध्ये रॉक रेड, लेक ब्लू आणि ग्रेव्हल ग्रे या तीन थीमसह सादर करण्यात आली आहे.

कंपनीने रॉयल एनफील्ड हिमालयन यूके वितरक MotoGB कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बाईकची नवीन आवृत्ती सादर केली आहे. अपडेट केलेल्या हिमालयन मॉडलच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रंग आणि ट्रायपर नेव्हिगेशन सिस्टिमचा समावेश आहे. ही सिस्टम याआधी रॉयल एनफील्ड मीटिओर 350 सह सादर करण्यात आली होती. इंस्ट्रूमेंट कंसोलचं मूळ डिझाईन आणि लेआऊटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 2021 हिमालयनमध्ये केवळ काही कॉस्मेटिक बदल आणि काही नवीन फीचर्स वाढवण्यात आले आहेत. या बाईकच्या पॉवरट्रेनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

रॉयल एनफील्डच्या या नवीन हिमालयन बाईकमध्ये बीएस 6 कंप्लायंट 411 सीसीचे सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन आहे जे 24.3bhp पॉवर आणि 32Nm पीक टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त यात 5 स्पीड कॉन्स्टेंट मेश गिअरबॉक्स देण्यात येणार आहे. क्लासिक 350 ड्युअल-चॅनेल एबीएस नंतर बीएस 6 एमिशन नॉर्म्सनुसार येणारी ही बाइक रॉयल एनफील्डची दुसरी बाईक आहे. यात ड्युअल-चॅनेल एबीएस हॅजार्ड स्विच, मजबूत ब्रेक मेकॅनिझम आणि चांगला साइड-स्टँड आहे.

संबंधित बातम्या

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह ‘या’ बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या

Royal Enfield । रॉयल एनफिल्डची बाजारात धूम, विक्रीत जबरदस्त वाढ, या बाईकला आहे जास्त मागणी

रॉयल एनफील्ड Interceptor 650 आणि Continental GT 650 चं नवं मॉडेल लाँच, किंमत…

(2021 Royal Enfield Himalayan waiting period deatails)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें