5

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह ‘या’ बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या

बहुतेक दुचाकी उत्पादकांनी एप्रिल 2021 मध्ये भारतात त्यांच्या मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. तुम्ही जर Royal Enfield प्रेमी असाल तर ही बातमी तुम्हाला निराश करु शकते.

Royal Enfield प्रेमींसाठी वाईट बातमी, बुलेटसह 'या' बाईक्स 13000 रुपयांनी महागल्या
Royal Enfield Classic 350
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 8:31 AM

मुंबई : आपली आवडती कार किंवा मोटरसायकल खरेदी करणे आता महाग झालं आहे. बहुतेक दुचाकी उत्पादकांनी एप्रिल 2021 मध्ये भारतात त्यांच्या मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही जर Royal Enfield प्रेमी असाल तर ही बातमी तुम्हाला निराश करु शकते. रॉयल एनफील्डने आपल्या मोटारसायकलच्या 350 cc रेंजच्या किंमती वाढवल्या आहेत. (Royal Enfield raised price of bullet 350 and other motorcycles by Rs 13000)

काही रॉयल एनफील्ड (Royal Enfield) मॉडेल्सची किंमत 13,000 रुपयांनी वाढवली जाणार आहे. याआधी जानेवारी 2021 मध्ये या मोटारसायकलींची किंमत 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. हिमालयन आणि 650 cc twin 2021 साठी अपडेट केलं होतं आणि आता त्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

कंपनीने बुलेट 350 रेंजच्या किंमतीत सर्वाधिक वाढ केली आहे. या बाईकच्या व्हेरिएंटनुसार या बाईकच्या किंमतीत 7,000 रुपये ते 13,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 350 रेंजमध्ये समाविष्ट डुअल चॅनल ABS व्हेरिएंटच्या किंमतीत 10,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मीटिओर 350 रेंजच्या किंमतींमध्ये 6000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 या दोन बाईक फेब्रुवारी 2021 मध्ये नवीन रंगांसह लाँच करण्यात आल्या होत्या आणि त्या दोन्ही बाईकच्या किंमती 2,75,467 रुपयांपासून ते 3,14,367 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहेत. या किंमती जानेवारी 2021 मध्ये लागू झालेल्या किंमतींपेक्षा कमीत कमी 6,000 रुपयांनी (व्हेरिएंट टू व्हेरिएंट) जास्त आहेत. त्याचप्रमाणे 2021 हिमालयन ही बाईक फेब्रुवारी 2021 लाँच करण्यात आली होती. या बाईकची किंमत 2 लाख रुपयांपासून सुरु होते.

Royal Enfield च्या ज्या मॉडल्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे त्यांची यादी

मॉडेल                                                                                  नव्या किंमती (ऑन-रोड, दिल्ली)

Bullet 350                                                                         161,385 रुपये Bullet 350 ES                                                                   177,342 रुपये Classic 350 (Dual-Channel ABS)                                 2,05,004 रुपये Meteor 350 (Fireball)                                                    2,08,751 रुपये Meteor 350 (Stellar)                                                      2,15,023 रुपये Meteor 350 (Supernova)                                              2,25,478 रुपये

रॉयल एनफिल्डची बाजारात धूम

नवीन महिन्याच्या सुरूवातीस, वाहनधारकांनी त्यांचे विक्री अहवाल सादर करण्यास सुरवात केली आहे. मार्चचा महिना हा देशातील आघाडीच्या परफॉर्मन्स बाईक निर्माता रॉयल एनफिल्ड(Royal Enfield)साठी अधिक चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार मार्च महिन्यात कंपनीने एकूण 60,173 वाहने विकली आहेत, जी मागील वर्षाच्या मार्च महिन्याच्या तुलनेत 84 टक्के जास्त आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने केवळ 32,630 वाहनांची विक्री केली होती. त्याचबरोबर कंपनीने या कालावधीत 5,885 वाहनांची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त 3,184 वाहने होती. कंपनीला निर्यात व्यवसायाची गरज असते, कारण कंपनीला केवळ इतर देशांमध्ये उपस्थिती हवी असते असे नाही तर जागतिक बाजारातील मिड सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करु इच्छिते.

इतर बातम्या

KTM ची वजनाने हलकी आणि दमदार ‘सुपर डुपर’ बाईक सादर

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220

(Royal Enfield raised price of bullet 350 and other motorcycles by Rs 13000)

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?