KTM ची वजनाने हलकी आणि दमदार ‘सुपर डुपर’ बाईक सादर

केटीएमने (KTM) आपल्या सुपर डुपर लिमिटेड मॉडेलची अधिकृत घोषणा केली आहे. KTM 1290 Super Duke RR असं या बाईकचं नाव आहे.

KTM ची वजनाने हलकी आणि दमदार 'सुपर डुपर' बाईक सादर
KTM 1290 Super Duke RR
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 7:40 AM

मुंबई : केटीएमने (KTM) आपल्या सुपर डुपर लिमिटेड मॉडेलची अधिकृत घोषणा केली आहे. केटीएम 1290 सुपर ड्यूक आरआर (KTM 1290 Super Duke RR) असं या बाईकचं नाव आहे. ही एक हलकी, अधिक फोकस्ड मोटरसायकल आहे. (KTM announced limited edition model of super bike KTM 1290 Super Duke RR)

1290 Super Duke RR ही बाईक 1290 सुपर ड्यूकची सुधारित आवृत्ती आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत नवीन बाईक खूपच दमदार आहे. नवीन RR, सुपर ड्यूक आरपेक्षा 9 किलोने हलकी आहे, या बाईकचं वजन 180 किलो इतकं आहे. या बाईकचे 1,301 सीसी इंजिन, एलसी 8, 75-डिग्री, व्ही-ट्विन सुमारे 180 बीएचपी पॉवर आणि 140 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं.

केटीएमने या बाईकमध्ये कार्बन फायबर घटकाचा वापर केला आहे. ज्यामुळे बाईकचे वजन कमी करण्यास मदत झाली आहे. याचं शार्प टेल युनिटही कार्बन फायबरचे असून चाके पूर्वीपेक्षा 1.5 किलो हलकी आहेत. या बाईकची चाके मिशेलिन पॉवर कप 2 टायरसह सादर करण्यात आली आहेत.

आरआर बाईकमध्ये WP Apex Pro 7548 Close Cartridge फोर्क, एक अॅडजस्टेबल WP Apex Pro 7117 स्टीयरिंग डंपर आणि Apex Pro 7746 रियर शॉक देखील आहे. ट्रॅक आणि परफॉरमन्स रायडिंग मोडसह RR वरील इलेक्ट्रॉनिक पॅकेजही सुधारित केले गेले आहे, जे रियर व्हील स्लिप, थ्रॉटल रिस्पॉन्स, लॉन्च कंट्रोल आणि मोटर स्लिप रेग्युलेशनसाठी अधिक अॅडजस्टेबिलिटी प्रदान करते.

KTM 1290 Super Duke RR पैकी केवळ 500 उत्पादित होणार आहेत, त्यातील काही युरोपमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येतील. भारतासाठी केटीएम 1290 सुपर ड्यूक आर च्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

2021 KTM RC 390 लाँचिंगच्या मार्गावर

2021 KTM RC 390 ही बाईक एप्रिलमध्ये लाँच केली जाणार असून अलीकडेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे बाईकमद्ये मोठे अपडेट्स मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाईकमध्ये 373cc सीसीचे सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले जाणार आहे जे 44hp पॉवर आणि 35 Nm टॉर्क जनरेट करेल. या बाईकच्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, हेडलॅम्पच्या भोवती पारदर्शक फेअरिंग दिली जाऊ शकते.

इतर बातम्या 

20 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा सेकंड हँड बाईक, फक्त करा एक काम

Suzuki चा भारतीय बाजारात धुमाकूळ, मार्च महिन्यातील विक्रीत तब्बल 72 टक्क्यांची वाढ

जबरदस्त मायलेज पाहिजे? ‘या’ 5 Bikes तुमच्यासाठी परफेक्ट, किंमतही कमी

(KTM announced limited edition model of super bike KTM 1290 Super Duke RR)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.