KTM लव्हर्ससाठी वाईट बातमी, कंपनीने RC 125 आणि RC 390 ची किंमत वाढवली, जाणून घ्या नवीन किंमती

KTM कंपनीने बारतात त्यांच्या बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यापूर्वी केटीएम स्ट्रीटफाइटर्स म्हणजेच केटीएम 200 ड्युक, 250 ड्युक आणि 390 या बाईक्सची किंमत वाढवण्यात आली होती

KTM लव्हर्ससाठी वाईट बातमी, कंपनीने RC 125 आणि RC 390 ची किंमत वाढवली, जाणून घ्या नवीन किंमती
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 10:09 PM

मुंबई : भारतात KTM आणि Husqvarna बाईक्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी केटीएम स्ट्रीटफाइटर्स (KTM Street Fighters) म्हणजेच केटीएम 200 ड्युक, 250 ड्युक आणि 390 या बाईक्सची किंमत वाढवण्यात आली होती. आता या यादीत अजून दोन नव्या बाईक्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने आता RC 125 आणि RC 390 या दोन बाईक्सची किंमत वाढवली आहे. (Price hike alert! KTM RC 125, RC 390 get costlier in India by this much)

डीलर्सकडे केटीएम RC 125 च्या किंमतीत 1 हजार 280 रुपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बाईकची एकूण किंमत आता 1 लाख 61 हजार 101 रुपये इतकी झाली आहे. दुसऱ्या बाजूला कंपनीने केटीएम RC 390 या बाईकची किंमतदेखील वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने KTM RC 390 च्या किंमतीत तब्बल 3 हजार 537 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या बाईकची एकूण किंमत आता 2 लाख 56 हजार 917 रुपये झाली आहे.

या सर्व दिल्लीतल्या एक्स शोरुम किंमती आहेत. या बाईकच्या किंमती थोड्याफार वाढवल्या असल्या तरी ही वाढ 390 ड्युकच्या किंमतीत करण्यात आलेल्या वाढीइतकी नाही. 390 ड्युकच्या किंमतीत नुकतीच 8 हजार 515 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यावेळी कंपनीने कोणत्याही बाईकच्या किंमतीत 3 हजारांहून अधिक वाढ केलेली नाही.

कंपनीने केवळ गाड्यांच्या किंमतींमध्ये बदल केले आहेत, गाड्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अगदी गाड्यांच्या डिझाईनमध्येही बदल केलेले नाहीत. केटीएम फॅमिलीमध्ये सहभागी होण्यासाठी RC 125 एक परफेक्ट सुपरस्पोर्ट तिकीट आहे. RC 390 ही बाईक त्या लोकांसाठी आहे, ज्यांना जास्त पॉवर आणि अधिक फिचर्स हवे असतात. दोन्ही गाड्यांचे बॉडीवर्क सारखेच आहे.

KTM च्या ‘या’ बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार

KTM 125 ड्युक (KTM 125 Duke) ही बाईक नव्या डिझाईनसह भारतात 2021 मध्ये लाँच केली जाणार आहे. त्यासाठी कंपनी पूर्णपणे सज्ज आहे. ही बाईक नुकतीच डीलरशिपकडे पाहायला मिळाली आहे. KTM 125 ड्युक स्पोर्ट्स ही बाईक 2012 मध्ये पहिल्यांदा भारतात पाहायला मिळाली होती. आता या बाईकच्या नव्या व्हर्जनचे बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. नवी KTM 125 Duke स्पोर्ट्स बाईक तुम्ही अवघ्या 5000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बुक करु शकता.

केटीएमने 125 Duke च्या डिझाईनमध्ये फार बदल केलेले नाहीत. ही बाईक 200 Duke सारखीच दिसेल. तुम्ही ही बाईक कलर थीम आणि डीकॅल्सच्या आधारावर ओळखू शकता. कंपनीने बाइकमध्ये व्हाईट फ्युल टँक आणि बोल्ड ऑरेंज एक्सटेन्शन दिलं आहे. याद्वारे कंपनी देशातील तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात ही बाईक तरुणांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. परंतु इतर स्पर्धकांना जोरदार टक्कर देण्यासाठी कंपनीने बाईकमध्ये काही बदल केले आहेत. दरम्यान असे सांगिले जात आहे की, ही बाईक अधिकृतरित्या लाँच होईपर्यंत अनेक वेगवेगळ्या रंगांमधील या बाईकचे व्हेरियंट्स आपल्यासमोर येतील.

इतर बातम्या

Duster आणि Triber सह ‘या’ गाड्यांवर रेनॉ कंपनीकडून 70 हजार रुपयांपर्यंतची सूट

‘या’ आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

(Price hike alert! KTM RC 125, RC 390 get costlier in India by this much)

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.