AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220
Bajaj Avenger 220 चा प्रातिनिधिक फोटो
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 02, 2021 | 10:39 AM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Avenger Cruise 220 in just Rs 69000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 69 हजारात Bajaj Avenger Cruise 220

CredR वर तुम्हाला केवळ 69 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Avenger Cruise 220 बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 220cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Pune-Hinjawadi-Road/Bajaj-Avenger-Cruise-220/17796) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक दिल्लीतली आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 14,556 किलोमीटर धावली आहे. यात तुम्हाला बाईक, टायर्स, इंजिन, परफॉरमन्स, एक्सटीरियर बॉडी, फोर्क असेंबली, मीटर सेक्शन, फ्रंट आणि रियर व्हील सेक्शनच्या फीचर्सविषयीची माहिती मिळेल.

Bajaj Avenger 220 BS6 चे फीचर्स

कंपनीने गेल्या वर्षी ही बाईक बीएस 6 इंजिनसह बाजारात सादर केली होती. यात तुम्हाला सिंगल सिलिंडर ट्विन्सपार्क ऑइल कूल्ड इंजिन मिळेल ज्यामध्ये फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह कॅटालिटिक कन्व्हर्टर देखील आहे, जे 7508rpm वर 18.7bhp आणि 7000rpm वर 17.5nm पीक टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त, या बाईकच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस अॅडजस्टेबल ट्विन स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आलं आहे. सोबतच या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल चॅनल एबीएस सिस्टिम देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 1,45,930 रुपये इतकी आहे.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

इतर बातम्या

TVS च्या दुचाकींना जगभरातील ग्राहकांची पसंती, मार्च 2021 मध्ये रेकॉर्डब्रेक निर्यात

Photo | अलीबाबाने सादर केली एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक, सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटर धावणार

‘ही’ आहे जगातली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक! प्रति किमी फक्त 20 पैसे खर्च, वाचा धमाकेदार फिचर्स

(Buy Bajaj Avenger Cruise 220 in just Rs 69000)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!