TVS च्या दुचाकींना जगभरातील ग्राहकांची पसंती, मार्च 2021 मध्ये रेकॉर्डब्रेक निर्यात

टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) जाहीर केले आहे की, मार्च 2021 मध्ये कंपनीने एक लाखाहून अधिक दुचाकींची निर्यात केली आहे.

TVS च्या दुचाकींना जगभरातील ग्राहकांची पसंती, मार्च 2021 मध्ये रेकॉर्डब्रेक निर्यात
TVS Bike
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 9:11 AM

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) जाहीर केले आहे की, मार्च 2021 मध्ये कंपनीच्या दुचाकींची निर्यात 100,000 युनिट्सपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये मोटारसायकल विक्रीत झालेल्या वाढीचे या कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीच्या दुचाकींची निर्यात 35 टक्क्यांनी वाढून 89,436 युनिट्सवर पोहोचली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या तिमाहीत टीव्हीएस मोटर कंपनीची एकूण निर्यात 2.61 लाख इतकी होती, तर एप्रिल ते डिसेंबर 2020 पर्यंत ही निर्यात 5.55 लाख युनिट्स इतकी होती. (TVS Motor Company two-wheeler export reaches 100,000 unit milestone)

निर्यातीच्या बाबतीत हा मैलाचा दगड पार केल्यानंतर टीव्हीएस मोटर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले की, “आमच्या आंतरराष्ट्रीय दुचाकी व्यवसायाने मार्च महिन्यात 100,000 युनिट्सची विक्री साधली असल्याने टीव्हीएस मोटर कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्टी आहे. आम्ही आमच्या सन्माननीय ग्राहक, वितरक, पुरवठा करणारे आणि आमच्या दमदार टीमचे आभारी आहोत, ज्यांच्यामुळे हे सर्वकाही शक्य झालं आहे.

60 हून अधिक देशात निर्यात

आमच्या उद्योगातील सहकाऱ्यांसमवेत, आम्ही जागतिक बाजारात भारतीय दुचाकी आणि तीन चाकी भारतीय वाहनांना अधिक लोकप्रिय आणि महत्वाकांक्षी बनवण्यास उत्सुक आहोत. टीव्हीएस ही दुचाकी वाहनांची निर्यात करणारी भारतातील दुसर्‍या क्रमांकाची भारतीय कंपनी आहे, परदेशी बाजारातही या कंपनीची स्थिती खूप चांगली आहे. या यादीमध्ये आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया, भारतीय उपखंड, मध्य आणि लॅटिन अमेरिका अशा विविधी प्रांतांमधील 60 हून अधिक देशांचा समावेश आहे.

युरोप आणि उत्तर अमेरिकेत निर्यात करणार

कंपनीला युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे. ज्यामध्ये टीव्हीएस अपाचे, टीव्हीएस HLX सिरीज आणि टीव्हीएस स्ट्रायकर सिरीज या प्रमुख वाहनांची निर्यात केली जाईल. एप्रिल 2020 मध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने ब्रिटिश मोटरसायकल ब्रँड नॉर्टन मोटरसायकल घेतली आहे. नॉर्टन सध्या Solihul मध्ये त्यांचा नवीन कारखाना आणि कॉर्पोरेट मुख्यालयाची उभारणी करत आहे. त्यासंबंधीचं काम अंतिम टप्प्यात आहे. 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत हे काम पूर्ण होऊन कारखाना आणि कॉर्पोरेट कार्यालय कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे.

इतर बातम्या

TVS Star City Plus चं नवं वेरिएंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अपडेटेड फीचर्ससह नवी बजाज पल्सर लाँचिंगसाठी सज्ज

एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक बाजारात, सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटर धावणार

(TVS Motor Company two-wheeler export reaches 100,000 unit milestone)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.