AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक बाजारात, सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटर धावणार

चिनी ई-कॉमर्स ग्रुप अलीबाबाने (Alibaba Group) वन व्हील इलेक्ट्रिक बाईक (One Wheel Electric Bike) सादर केली आहे,

एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक बाजारात, सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटर धावणार
Alibaba One Wheel Electric bike
| Updated on: Mar 27, 2021 | 2:33 PM
Share

बीजिंग : चिनी ई-कॉमर्स ग्रुप अलीबाबाने वन व्हील इलेक्ट्रिक बाईक (One Wheel Electric Bike) सादर केली आहे, जी तुमच्या पसंतीस उतरेल. अलीबाबाने यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहन बाजारात जोरदार एंट्री घेतली आहे. अलीकडेच त्यांनी SAIC सह नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी वायरलेस चार्जिंग सादर करण्याची घोषणा केली आहे. (Electric Motorcycle With One Wheel, Launched By Alibaba)

Single Wheel Electric Bike च्या फोटोमध्ये आपल्याला स्टील ट्रेलिस फ्रेमसह फॉक्स फ्यूल टँकला सपोर्ट करणारी एकचाकी इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळतेय. या मोटारसायकलच्या टँकचं डिझाईन आणि रेड कलर ट्रेलिस फ्रेम डुकाटी मॉन्स्टरसारखं आहे, ज्यामुळे ही बाईक अधिक आकर्षक दिसतेय.

या सिंगल-व्हील ईव्हीमधील इलेक्ट्रिक मोटर 2000 वॅट्सची शक्ती देते आणि ही मोटर दुचाकीला 48 किमी प्रतितास वेग देण्यास सक्षम आहे. या ईव्हीमधील पॅनासॉनिक बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये 60-100 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3-12 तास लागतात.

या सिंगल व्हील इलेक्ट्रिक बाईकमध्ये एक रियर पिलियन सीटदेखील आहे. परंतु या सीटच्या फंक्शनालिटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. या इलेक्ट्रिक वन व्हीलरची किंमत 1,500 डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 1.34 लाख रुपये आहे,

1 रुपयांत 5 किलोमीटर धावणार, नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

आयआयटी-दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप गॅलिओस मोबिलिटीने (Incubated Startup Galio Mobility) ‘होप’ नावाची इलेक्ट्रिक स्कूटर विकसित केली आहे, जी स्कूटर 20 पैशांमध्ये एक किलोमीटरपर्यंत धावेल. डिलिव्हरी आणि लोकल कम्यूटेशनसाठी ही एक किफायतशीर स्कूटर आहे. ही स्कूटर 25 किमी प्रति तास इतक्या स्पीडने धावू शकते. तसेच हे इलेक्ट्रिक वाहन सूट प्रकारात येते. ही स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणी करण्याचीदेखील आवश्यकता नाही.

‘होप’ (Hope Electric Ecooter) एका पोर्टेबल चार्जर आणि पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सज्ज आहे, जी बॅटरी घरात वापरल्या जाणार्‍या सामान्य प्लगद्वारे चार्ज केली जाऊ शकते. सामान्य प्लगद्वारे ही बॅटरी 4 तासात पूर्णपणे चार्ज केली जाते. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या रेंजच्या बॅटरी निवडण्याची सुविधा आहे. ग्राहक 50 किमी रेंज असलेली अथवा 75 किमी रेंज असलेल्या बॅटरीची निवड करु शकतो.

आयआयटी-दिल्लीने दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरिंग सिस्टम आणि पेडल असिस्ट युनिटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. यात IoT आहे जे डेटा अॅनालिटिक्सद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्कूटरबद्दल नेहमी माहिती देते. अशा प्रकारच्या फीचर्समुळे, होपची भविष्यात स्मार्ट आणि कनेक्टेड स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये गणना केली जाईल.

संबंधित बातम्या

बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace भारतात लाँच, किंमत फक्त…

Petrol ची टाकी फुल करण्याचं टेन्शन खल्लास, सिंगल चार्जमध्ये 60KM मायलेज देणारी इलेक्ट्रिक बाईक भेटीला

केवळ 50 मिनिटात फुल चार्ज, देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईकची रेकॉर्डब्रेक विक्री

(Electric Motorcycle With One Wheel, Launched By Alibaba)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.